• Mon. Nov 25th, 2024

    निरीक्षकाने लाच मागितली; मात्र डाव फसला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, काय घडलं?

    निरीक्षकाने लाच मागितली; मात्र डाव फसला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, काय घडलं?

    पालघर: बिअर शॉपचा परवाना देण्यासाठी ४ लाखांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ३ लाख ४० हजार रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य करणाऱ्या उत्पादन शुल्कचे पालघर येथील दुय्यम निरीक्षक नितीन संखे यांच्याविरुद्ध गुरुवारी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संखे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पालघर येथील पोलीस उप अधीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.
    अवकाळीचा पिकांना फटका; आठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी
    तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे बिअर शॉपचा परवाना मिळावा यासाठी जानेवारीमध्ये उत्पादन शुल्कच्या पालघर कार्यालयात अर्ज केला होता. या कार्यालयातील दुय्यम निरीक्षक नितीन संखे यांनी या अर्जावर कार्यवाही करुन बिअर शॉपचा परवाना देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ४ लाखांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने २० नोव्हेंबर रोजी एसीबीकडे तक्रार केली होती.

    मराठ्यांना ओबीसीत घेण्यास पाठिंबा दर्शवा, मग सन्मानाने बोलतो; मनोज जरांगेंचं छगन भुजबळांना आव्हान

    एसीबीच्या पडताळणीमध्ये संखे यांनी चार लाखांची मागणी करून तडजोडीअंती ३ लाख ४० हजार रूपये स्विकारण्याचे मान्य केल्याची बाब स्पष्ट झाली. त्यामुळे संखे यांच्याविरुद्ध एसीबीने पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed