अंतिम पाच जणांमध्ये प्रो. संजय ढोले, प्रो. विजय फुलारी, प्रो. राजेंद्र काकडे, प्रो. ज्योती जाधव, प्रो. विलास खरात आदींचा समावेश असल्याचे सुत्रांकडून कळते. विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड करण्यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नियुक्त केली. यात कुलगुरू डॉ. के. जी. सुरेश आणि एनआयटीचे संचालक डॉ. सुधाकर एडला हे दोन सदस्य. तर सदस्य सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आहेत.
कुलगुरू पदासाठी आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर मुलाखतीचा पहिला टप्पा २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत पार पडला. शोध समितीसमोर २२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यापैकी अंतिम पाच जणांची नावे राजभवनला पाठविण्यात आले. अंतिम मुलाखतीची प्रक्रिया राजभवनात १९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्याबाबत पाच उमेदवारांना ईमेलद्वारे कळविण्यात आले. दुपारी ३ वाजेपासून अंतिम मुलाखतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सायंकाळपर्यंत नवीन कुलगुरूंची निवड जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी १६ जुलै २०१९ रोजी त्यांनी कुलगुरू पदाची सुत्रे स्विकारली. त्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे.
अंतिम मुलाखतीसाठी पाच जणांमध्ये प्रो. संजय ढोले, प्रो. विलास खरात, प्रो. विजय फुलारी, प्रो. राजेंद्र काकडे, प्रो. ज्योती जाधव यांचा समावेश असल्याचे कळते. यामध्ये प्रो. ढोले, प्रो. फुलारी हे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. प्रो. काकडे हे एआयसीटीई तर प्रो. जाधव जीवरसायनशास्त्र तर प्रो. खरात हे गणित विषयाचे प्राध्यापक आहेत. यातील प्रो. विजय फुलारी व प्रो. ज्योती जाधव हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे, प्रो. संजय ढोले, प्रो. विलास खरात हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहेत. तर प्रो. काकडे हे एआयसीटीईचे प्रथम सल्लागार पदावर कार्यरत आहेत.