• Sat. Sep 21st, 2024

६७ वर्षांपूर्वी सुरक्षाकडं भेदून बाबासाहेबांच्या अस्थी आणल्या, वाचा प्रति चैत्यभूमीची कहाणी

६७ वर्षांपूर्वी सुरक्षाकडं भेदून बाबासाहेबांच्या अस्थी आणल्या, वाचा प्रति चैत्यभूमीची कहाणी

कोल्हापूर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. मुंबईत चैत्यभूमीवर उचललेल्या जनसागराच्या साक्षीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते याचवेळी कोल्हापुरातील हुपरी येथील काही आंबेडकरी अनुयायांनी प्रचंड बंदोबस्त असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी मिळवल्या होत्या. तेव्हापासून गेली ६७ वर्ष विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने या पवित्र अस्थीचं जतन केलं जात आहे.

महाराष्ट्र उत्तर-दक्षिणेला जोडणारा सांधा, स्वभान देणारं राज्य वाहवत गेलं तर… राज ठाकरेंची खास पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. मुंबईत बाबासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कोल्हापुरातून हुपरीचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर शिंगे, रामचंद्र कांबळे (रामू भाटे), मारुती कंगने, रतन कांबळे, नामदेव भोगले, गुंडा फुले, कृष्णा कांबळे, सिताराम कांबळे, अलगोंडा कांबळे, शंकर कांबळे (मडिलगेकर) बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते यावेळी चैत्यभूमीवर देशभरातून जमलेल्या जनसमुदायाच्या साक्षीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही या आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांच्या अस्थी मिळवल्या आणि त्या हुपरी येथे आणण्यात आल्या. तेव्हापासून गेली ६७ वर्ष विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेवा समितीच्या वतीने या अस्थींचं जतन केलं जात आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी या अस्थी सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुल्या केल्या जातात.

एक्सक्यूज मी, जरा बाजूला व्हा! चैत्यभूमीसमोरच्या व्ह्यूईंग डेकवर अस्वच्छता; अजितदादांनी चहलांचे कान टोचले

पश्चिम महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटकातील बौद्ध अनुयायांसाठी प्रति चैत्यभूमी

दरवर्षी सहा डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर देशभरातून आलेले लाखो आंबेडकर अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात, मात्र सर्वांनाच ते शक्य होत नाही यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे डॉ. आंबेडकरांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात येत असल्याने कोल्हापुरात प्रति चैत्यभूमीवर पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमा भागात असणारे आंबेडकर अनुयायी या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत.

बालपणी बाबासाहेबांनी जिथं पहिले शिक्षणाचे धडे गिरवले, ती शाळा आजही दिमाखात उभी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed