• Mon. Nov 25th, 2024
    जरांगेंच्या सभेसाठी निधी अन् यादी घेऊन निघालेल्या स्वयंसेवकाचा अपघातात मृत्यू; मराठा समाजावर शोककळा

    नांदेड : जरांगे पाटील यांची नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या सभेपूर्वी एका ४५ वर्षीय स्वयंसेवकावर काळाने घाला घातला आहे. सभेसाठी संकलन झालेली निधी आणि स्वयंसेवकांची यादी देण्यासाठी दुचाकीवर जात असलेल्या एका स्वयंसेवकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी कंधार तालुक्यातील बाळवंतवाडी येथे हा अपघात झाला. बालाजी नारायण जाधव असं अपघातात मृत झालेल्या स्वयंसेवकाचं नाव आहे. या घटनेनं मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त होतं आहे.

    नांदेड जिल्ह्यात जरांगे पाटील यांची पाच भव्य सभा होणार आहे. नांदेड शहरासह मारतळा, नायगाव आणि कंधार येथे जरांगेंची सभा पार पडणार आहे. सकल मराठा समाजाकडून सभेची भव्य तयारी केली जात आहे. लोहा तालुक्यातील चोंडी येथील रहिवासी बालाजी नारायण जाधव हे देखील कंधारच्या सभेची तयारी करत होते. निधी संकलन करण्यासाठी तसेच बैठकीसाठी जाधव हे सहभागी व्हायचे. मंगळवारी बालाजी जाधव हे सभेसाठी चोंडी गावातून निधी संकलन केले होते. संकलन केलेली निधी आणि स्वयंसेवकांची यादी आयोजकांना देण्यासाठी ते आपल्या मित्रासोबत दुचाकीने कंधार-घोडज मार्गावरून जात होते.

    मोठी बातमी! भाजपच्या ‘त्या’ १० खासदारांचा राजीनामा; PM मोदींसोबतच्या भेटीत निर्णय झाला
    बाळंतवाडी गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की बालाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर गुलाब लक्ष्मण गीते हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कंधार ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नांदेड येथील शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले. या घटनेनं मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

    नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी सभा

    मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची ७ आणि ८ डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात पाच सभा होणार आहे. पहिली सभा ७ डिसेंबर रोजी मुदखेड तालुक्यातील बारड येथे होणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी नांदेड शहरातील वाडी पाटीजवळ १११ एकर जागेवर भव्य सभा पार पडणार आहे. शिवाय त्याच दिवशी लोहा तालुक्यातील मारतळा, नायगाव आणि कंधार आदी ठिकाणी देखील सभा पार पडणार आहे. या सभेची सकल मराठा समाजातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

    मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण टिकणार नाही, आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवं: मनोज जरांगे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed