• Mon. Nov 25th, 2024
    माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    नाशिकः मालेगावचे माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून ते प्रदीर्घ काळ राज्य विधिमंडळाचे सदस्य राहिलेत. विधानसभेचे माजी सदस्य होते. मालेगाव मतदार संघातील लोकप्रिय आमदार अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी राजकारणात नगरसेवक नगराध्यक्ष, महापौर , आमदार आणि राज्यमंत्री पद दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद देखील भूषविले होते.

    याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, माजी आमदार रशीद शेख यांचे सोमवारी ४ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता तसेच काही दिवसांपूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना नाशिक एका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.अखेर शेख यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मालेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले.

    पोहता येत नसल्याने दोन सख्ख्या भावांचा बुडून अंत, लेकरांना पाहताच माऊलीचा टाहो; अख्खं गाव हळहळलं

    शेख यांची राजकीय कारकिर्द

    विधानसभा निवडणूक १९९९ मध्ये त्यांनी मिळवलेला विजय चर्चेत राहिला होता. २५ वर्षांपासून आमदार असलेल्या निहाल अहमत यांचा पराभव केला होता. रशीद शेख हे मालेगाव महानगर पालिकेचे महापौर राहिले होते. आमदारकीनंतर २०१७ मध्ये ते पुन्हा नगरसवेक झाले होते. त्या आधी १९९४ मध्ये त्यांनी नगराध्यक्ष पदही भूषवले होते. शिवाय तीन वेळा ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तत्पूर्वी ते काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्षही होते. काँग्रेस पक्षामध्ये असेल्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

    आज मालेगाव येथील आयेशानगर कब्रस्तान येथे त्यांचा दफन विधी करण्यात आला. रशिद शेख यांच्या निधनानंतर त्यांना नाशिक आणि मालेगाव मधील सर्वच स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाल्याचे देखील राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

    भुजबळ ‘गो बॅक’; येवल्यात मराठा बांधव संतप्त, काळे झेंडे दाखवले

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed