• Sat. Sep 21st, 2024
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक जीव गेला, २७ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

फुलंब्री : मराठा आरक्षण मिळत नसल्याने तालुक्यातील चिंचोली नकीब येथील एका २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेची पिशोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली…

गणेश काकासाहेब जंगले (वय २७, रा. चिंचोली नकीब, तालुका फुलंब्री) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. काकासाहेब जंगले शेतवस्तीवर गट क्रमांक १८२ मध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना तीन मुले आहे. त्यापैकी गणेश यांनी ‘आरक्षण मिळत नाही. माझा जगून काही फायदा नाही,’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली व राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाइकांकडे देण्यात आला.

धनगर आरक्षणासाठी फुलंब्रीत टोकाचं पाऊल, युवकाने अंगावर ओतून घेतले डिझेल पण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed