• Sat. Sep 21st, 2024
भाजपने ३ राज्य जिंकली, मोदी-शाहांसोबत तपास यंत्रणांचं अभिनंदन : संजय राऊत

मुंबई : मागील सहा महिन्यांपूर्वी हिमाचल आणि कर्नाटक जिंकल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास सातव्या आस्मानावर होता. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आपण सत्ता राखू आणि म. प्रदेशमध्ये भाजपकडून सत्ता हिसकावून घेऊ, असा होरा काँग्रेसचा होता. मात्र चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर समोर आलेल्या गणितांनुसार तेलंगणा वगळता काँग्रेसच्या अपेक्षेप्रमाणे काहीही झालेलं नाहीये. भाजपने मध्य प्रदेशची सत्ता राखताना राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता काँग्रेसच्या हातून हिसकावून घेण्यात यश मिळवलंय. त्यामुळे लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या ४ राज्यांच्या निवडणुकीत ३ राज्ये जिंकून भाजपने दणदणीत यश मिळवलंय. भाजपच्या विजयानंतर त्यांचं अभिनंदन करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तिरकस शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये.

मोदी शाह यांचं अभिनंदन करताना तपास यंत्रणांचं देखील अभिनंदन करायला पाहिजे

“मोदी शाह यांचं अभिनंदन करताना तपास यंत्रणांचं देखील अभिनंदन करायला पाहिजे. कारण विरोधकांच्या प्रचाराला खीळ बसविण्यासाठी तपास यंत्रणांनी इमाने इतबारे धाडी टाकल्या. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी गेली २ महिने अनेक राज्यांत घालवले. त्याचवेळी मतदान सुरू असताना देखील तपास यंत्रणा विरोधकांवर धाडी टाकत होत्या. त्यामुळे मोदी शाह यांच्याबरोबर तपास यंत्रणा देखील अभिनंदनास पात्र आहेत”, अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाने राज्यात एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा,गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान
म. प्रदेशात काँग्रेसने इंडिया आघाडीतून निवडणूक लढवायला पाहिजे होती

“मध्य प्रदेशात जुन्या साथीदारांना काँग्रेसने सोबत घेतलं नाही. म. प्रदेशात काँग्रेसने इंडिया आघाडीतून निवडणूक लढवायला पाहिजे होती. जर इंडिया आघाडीतून निवडणूक लढली असती तर तिकडे चित्र नक्की वेगळं असतं, असं सांगतानाच तीन राज्यांच्या पराभवानंतर काँग्रेसला नव्याने विचार विचार करावा लागेल”, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

राजस्थानात सत्ताबदल, ट्रेंड मोडण्यात ‘जादूगार’ गेहलोतांना अपयश,काँग्रेसच्या पराभवाची ५ कारणं
भाजप युद्धासारखी निवडणूक लढतं

त्याचवेळी शिवराजसिंह चौहान यांनी निवडणूक उत्तमरित्या हाताळली. मोदी-शाह यांचे दौरे आणि चौहान यांच्या सभांनी भाजपने युद्धाप्रमाणे निवडणुका लढवली, हेच भाजपच्या विजयाचं तंत्र आहे. आम्ही लोकशाही मानणारे आहोत. हा खरोखर जनतेचा कौल असेल तर आम्ही तो मान्य करतो, असा टोला राऊतांनी लगावला.

मध्य प्रदेश किंवा राजस्थान दोनपैकी एका राज्यात भाजपचा पराभव होईल; संजय राऊतांचा दावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed