• Mon. Nov 25th, 2024

    Video: पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये मारामारी, वाहनांची तोडफोड करत दहशत; नाशकातील धक्कादायक प्रकार

    Video: पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये मारामारी, वाहनांची तोडफोड करत दहशत; नाशकातील धक्कादायक प्रकार

    नाशिक : नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडई भागातील वाहनांची एका टोळक्याने तोडफोड केली आहे. हातात लाठ्या काठ्या घेत या अज्ञात टोळक्याने सात ते आठ चारचाकी आणि दोन ते तीन दुचाकींची तोडफोड केली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दोन गटातील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, वाहन तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या नाशकातील चौक मंडई परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसण मारामारी व दगडफेकीत झाले. त्यानंतर काही युवकांनी गैर कायद्याच्या मंडळीना सोबत घेत परिसरातील वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हे टोळके फरार झाले होते.
    हिंदुस्तान का दिल देखो! मध्य प्रदेशात पुन्हा शिव’राज’; इंदूरमधील मराठी माणसांची भाजपला साथ
    या घटनेप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी रात्री उशिरा तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मागच्या गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील गुन्हेगारी ही वाढतांनाच दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच शहरात दोन हत्या झाल्या होत्या. त्यानंतर वर्दळीचा परिसर असलेल्या जुने नाशिक भागातील चौक मंडई परिसरात हातात लाठ्याकाठ्या घेत टोळक्याने धुडगूस घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.

    दरम्यान, परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न चालू असताना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धुडगूस घालणाऱ्या टोळक्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.

    Rajasthan Election Result 2023: खासदारांना आमदारकी लढवायला सांगितली; ७ जागांवर मोदी-शहांचा डाव; BJPच्या प्लानचं काय झालं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *