• Sat. Sep 21st, 2024
आत्या विरुद्ध भाचा संघर्ष पेटणार? बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात कोण? अजित पवारांच्या घोषणेनंतर खळबळ

बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या वेगळे झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी बारामती आणि शिरूर या दोन मतदार संघाची सद्या तरी निवड केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान; दत्ता दळवी यांना जामीन, मुलुंड न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय
मात्र आता बारामतीची चर्चा आता पुन्हा होऊ लागली आहे. कारण बारामती हा सुप्रिया सुळे यांचा मतदार संघ आहे. या मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळू शकते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत वेगळा गट निर्माण केला. त्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मात्र बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नक्की कोण हा विषय आता चर्चेला आला आहे.

तुम्ही उद्या कुणीही झालात तरी शरद पवारच तुमचे निर्माते, जग हे विसरणार नाही : जितेंद्र आव्हाड

कारण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील बारामतीमधून लोकसभेसाठी उमेदवारी घेण्याची शक्यता आहे. तसेच पार्थ पवार यांना देखील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजित पवारांनी मंथन सभेत जरी बारामतीची घोषणा केली असली तरी अद्याप उमेवारीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. याबाबत येणाऱ्या काळात सर्व गोष्टी समोर येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed