• Mon. Nov 25th, 2024

    राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कसोटी, अजित पवारांचा साताऱ्यावर दावा पण उमेदवार कोण असणार?

    राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कसोटी, अजित पवारांचा साताऱ्यावर दावा पण उमेदवार कोण असणार?

    सातारा : सातारा, बारामती, शिरुर आणि रायगड या आपल्याकडे असणाऱ्या ४ जागा लढवणार आहोत. त्याचसोबत अन्य जागांवरही निवडणूक लढवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जत येथील राष्ट्रीय अधिवेशनात जाहीर केले. अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ आता चर्चेचा विषय ठरू लागला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे.

    पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. सातारा जिल्हा हा नेहमीच पवार कुटुंबियांच्या पाठीशी राहिलाय. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनही सातारा जिल्ह्याचा राज्यात दबदबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे स्वतंत्र गट तयार झाले आहेत. सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पाटील यांची प्रकृती, वय पाहता शरद पवार गट या ठिकाणी उमेदवाराच्या शोधात असून महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तीन ते चार नेत्यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते.

    अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक लढणार असल्याचे कर्जत येथील शिबिरात जाहीर केल्यानंतर अजितदादा पवार गटाचा उमेदवार कोण? याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. यात पूर्वीपासूनच अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. नितीन पाटील हे वाई- खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर मकरंद पाटील यांची भूमिका तळ्यात मळ्यात राहिली होती. प्रथम ते शरद पवार गटामध्ये पवार यांच्याबरोबरच दिसले तर काही दिवसानंतर किसनवीर कारखाना आणि मतदारसंघाच्या विकासकामासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अजितदादा गटात सामील होत असल्याचे त्यांनी मुंबईत जाऊन जाहीर केले होते.

    या घडामोडीच्या पडद्यामागे राजकीय समीकरणे घडत होती. या समीकरणात जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटीलच होते, अशी चर्चा होती तेव्हापासूनच नितीन काका हेच अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार असतील हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अजितदादांनी सातारा लोकसभा मतदारसंघ लढवणार असल्याची जाहीर केल्याने नितीन पाटील हेच उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता ते युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. मागील महिन्यात मुख्यमंत्री आपल्या दरे गावी आले असता मकरंद पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. याशिवाय जिल्ह्यातील आणखी एका बड्या नेत्याच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे.

    पहिल्यापासूनच हा सातारा लोकसभा (पूर्वीचा कराड) मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला आला होता. पण, आता सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने दावा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तीन वेळा सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते.

    २०१९च्या निवडणुकीत राजकीय समीकरण बदलल्याने फक्त उदयनराजे भोसले हे व्यक्तिमत्त्व पाहून शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला होता. या मतदारसंघावर भाजपही धावा करू लागल्याने मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. भाजपने या लोकसभा मतदारसंघात फिल्डिंग लावली असली तरी आपला उमेदवार गुलदस्त्यातच ठेवला आहे, नाव सांगू, असे या पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी यांची स्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव हे सातारा लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढली आहे.

    २०२४ ला आता महायुतीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडावा, यासाठी पुरुषोत्तम जाधव हे आग्रही राहिले आहेत, त्यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे.
    पार्थ पवारांचं राजकीय लाँचिंग, पण अजितदादांनी निवडलेल्या मतदारसंघावर चार ‘पक्षां’ची घारीसारखी नजर
    इच्छुकमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव १०० टक्के लढण्याची शक्यता आहे. युती वाटपात या संघात जर वाटाघाटी झाल्या आणि तो मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही, तर पुरुषोत्तम जाधव काहीही झाले तरी लढण्याची शक्यता आहे. कारण दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांगली मते घेतले आहेत. त्यांचा जनसंपर्क सुद्धा आहे. मध्यंतरीचा एक दोन वर्षाचा काळ सोडला, तर ते २०१० पासून जिल्हाप्रमुख म्हणून शिवसेनेचेच काम करत आहेत.
    शिरूर लोकसभेच्या जागेवर अजितदादांचा दावा; शिवाजी आढळराव पाटील शिवसेनेत राहणार की राष्ट्रवादीत जाणार ?
    जाधव महायुतीत असले तरी खंडाळा तालुक्याला गेल्या साठ वर्षात आजपर्यंत आमदारकी अथवा खासदारकीची संधी मिळालेली नाही. त्यामुळे हा तालुका मागास राहिला आहे, असे पुरुषोत्तम जाधव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे आगामी लोकसभेची निवडणूक ते लढणारच असे चित्र दिसत आहे. त्यातच आज अजितदादा पवार यांनी सातारा बारामती, शिरुर आणि रायगड या लढवणारच आहोत. जाहीर करून भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांना आव्हानच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
    शरद पवारांनीच अध्यक्षपदाचा राजीनामा मागं घेण्यासाठी आंदोलन करायला सांगितलं, अजित पवारांचा खळबळजनक दावाRead Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *