• Fri. Sep 18th, 2026

आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकप्रतिनिधी एकवटले राज्यपालांकडे या सहा प्रमुख मागण्यांसाठी साकडे

ByMH LIVE NEWS

Mar 13, 2026
आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकप्रतिनिधी एकवटले राज्यपालांकडे या सहा प्रमुख मागण्यांसाठी साकडे

मुंबई

लोकभवन येथे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विविध प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत सर्व आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाने माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्माजी यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी आमदार भीमराव केराम यांनी सर्व लोकप्रतिनिधींच्या समवेत माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्माजी यांना भगवान बिरसा मुंडा यांची मूर्ती भेट देऊन शुभेच्छा दिल्या

राज्यातील आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नावर आणि आदिवासी विकास विभागाशी संबंधित धोरणात्मक निर्णयाबाबत विधानसभेच्या प्रमुख लोकप्रतिनिधींनी आक्रमक पाऊल उचलले आहे आमदार भीमराव केराम ,नरहरी झिरवाळ,डाॅ. विजयकुमार गावित, यांच्यासह अनेक आमदारांनी नवनियुक्त राज्यपाल माननीय श्री जिष्णू देव वर्मा यांची भेट घेऊन आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी सहा महत्त्वाच्या मागण्याचे निवेदन सादर केले पत्रात नमूद केल्यानुसार गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी विकासाचे महत्वाचे विषय प्रलंबित असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे लोकप्रतिनिधींची एकजुट्या निवेदनावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार भीमरावजी केराम, विजयकुमार गावित,
धर्मराव बाबा आत्राम,मा.आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके,आ.राजू तोडसाम,आ.किरण लामटे, आ.आमश्या पाडवी यांच्यासह 15 हून अधिक आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत आदिवासींच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी हे निर्णय घेणे काळाची गरज आहे अशी भावना यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed