पुणे : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्यानं येत्या काळात राजकीय वातावरण तापणार आहे. प्रत्येक पक्षांकडून आपापल्या मतदार संघात दावे ठोकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मावळ लोकसभेवर राष्ट्रवादीचाच खासदार निवडून येणार असा दावा आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. तळेगाव दाभाडे येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर देखील भाष्य केले आहे. सध्या मावळच्या जागेवर एकनाथ शिंदे समर्थक श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत.
यावेळी सुनील शेळके म्हणाले की, मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, यासाठी रीतसर ,लेखी स्वरूपात ही जागा का मागतोय या संदर्भात येत्या आठ दिवसांत सर्वच लोकप्रतिनिधींसमोर बाजू मांडणार आहोत. तसेच पिंपरी चिंचवड येथे देखील राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, राष्ट्रवादीचा तो बालेकिल्ला आहे. मावळ विधानसभेत देखील राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. इतर तालुक्यात देखील राष्ट्रवादीची पकड असल्याचे शेळके यांनी सांगितले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे, असा आमचा अट्टाहास असेल असेही सुनील शेळके यांनी सांगितले.
तिसऱ्यांदा इच्छा व्यक्त करणाऱ्या लोक प्रतिनिधीने जनतेसमोर येऊन सांगावं, मी गेल्या नऊ वर्षांमध्ये मावळसाठी केंद्राकडून एवढी कामे केली आहेत, जर कुणी असे संभ्रमात असेल की, मला पुन्हा मोदी लाटेवर लॉटरी लागेल तर त्याने तो आपला संभ्रम काढून टाकला पाहिजे, असा टोला देखील सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांना लगावला आहे.
लोकसभा जागा वाटपावरुन महायुतीत पेच

लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी असताना महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी महायुतीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत संभ्रम आहे. भाजप २६ आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागा लढवेल, अशा चर्चा सुरु होत्या. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटप झालं नसून २६/२२ जागा वाटपाच्या चर्चेचा आधार असेल, असं म्हटलं आहे. त्यामुळं आगामी काळात महायुतीमधील जागा वाटपाचा पेच कसा सुटणार याकडे लक्ष लागलं आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News