• Sat. Sep 21st, 2024
IAS होण्याचं स्वप्न भंगलं, मनावर झाला घात; तरुणाने राहत्या घरात उचललं टोकाचं पाऊल

नागपूर : आएएस किंवा आयपीएस होण्याचे स्वप्न भंगल्याने २५ वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमधील खोली क्रमांक ३११ मध्ये उघडकीस आली. शुभम सिद्धार्थ कांबळे रा. वर्मानगर, गंगाखेड, परभणी असे मृतकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला शुभम हा नागपुरात आला. तो हॉटेल राजहंसमध्ये थांबला. त्यानंतर तो खोलीतून बाहेर निघाला नाही. सोमवारी सायंकाळी हॉटेलच्या फोनवर शुभमबाबत विचारणा झाली. व्यवस्थापक दिलीप बावणे वय ४५ यांनी कर्मचाऱ्याला शुभमला आवाज देण्यासाठी पाठविले.

कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला. प्रतिसाद मिळाला नाही. व्यवस्थापकाने गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. दरवाजा तोडला असता मनीष हा पलंगावर मृतावस्थेत पडलेला दिसला. बाजूलाच पाच विषारी द्रव्याच्या बादल्या आढळून आल्या. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केले.

पोलिसांनी शुभम याने आत्महत्येचेपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. यामध्ये त्याने लिहलं की, ‘मी स्वत: आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. मी आयएएस, आयपीएस होऊ शकलो नाही. याची मला खंत आहे’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed