• Tue. Nov 26th, 2024

    नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनो सावधान! फसवणूकींच्या प्रकारात वाढ, मुंबई बंदर प्राधिकरणाकडून इशारा

    नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनो सावधान! फसवणूकींच्या प्रकारात वाढ, मुंबई बंदर प्राधिकरणाकडून इशारा

    मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणात नोकरी मिळवून देतो, असे सांगून फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा प्राधिकरणानेच दिला आहे. तसेच नोकरीबाबतची माहिती वा अन्य तपशीलासाठी केवळ अधिकृत संकेतस्थळालाच भेट देण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

    स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेले ‘बॉम्बे बंदर’ पुढे ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ झाले व त्याचे नामकरण आता केंद्र सरकारने मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) म्हणून केले आहे. या मुंबई बंदर प्राधिकरणात ७ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या बंदराकडे १ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळाची जागा आहे. त्यापैकी जवळपास ४० लाख चौरस मीटरचा भाग हा समुद्रातील बोटींच्या दळणवळणासाठी आहे. उर्वरित भाग हा प्रत्यक्ष बंदराचा आहे. या बंदरांच्या भागात जवळपास २ लाख २२ हजार चौरस मीटरवर झाडीझुडपे आहे. इतका मोठा पसारा असलेल्या प्राधिकरणाकडून नव्याने काही जेट्टी तसेच जवहार बेटाचा विकास साधला जात आहे. त्यामुळे नव्याने नोकरीच्या संधी आवश्यकतेनुसार निर्माण होत आहेत. मात्र या प्राधिकरणात नोकरी मिळवून देतो, असे सांगत फसवणूक होत असल्याची धोक्याची सूचना प्राधिकरणाने दिली आहे.
    ‘टास्क’मुळे पुणेकरांचा खिसा खाली; ११ महिन्यांत ५००हून अधिक जणांना गंडा, अशी होते फसवणूक
    अधिकृत संकेतस्थळावरच माहिती

    प्राधिकरणाने याबाबत त्यांच्या https://mumbaiport.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर सूचना दिली आहे. त्यानुसार, ‘मुंबई बंदर प्राधिकरणाने नोकरीसाठी कुठल्याही सामाजिक माध्यमांवर जाहिरात दिलेली नाही. नोकरी, भरतीसंबंधीची सर्व माहिती केवळ या अधिकृत संकेतस्थळावरच दिली जाते. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर देण्यात येणाऱ्या नोकरीच्या जाहिरातीच्या प्रलोभनापासून दूर राहावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

    पोलिसांकडे तक्रार करा

    फसवणूक झाली असल्यास तात्काळ पोलिकांकडे किंवा सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी. तसेच त्या फसवणुकीची माहिती [email protected] या ई-मेलवरही कळवावी, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed