• Sat. Sep 21st, 2024

गोंदियात शेकडो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, २३ वर्षांत शासनाची फक्त १६७ कुटुंबीयाना मदत

गोंदियात शेकडो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, २३ वर्षांत शासनाची फक्त १६७ कुटुंबीयाना मदत

खेमेंद्र कटरे, गोंदिया : अवकाळी पाऊस, पिकाला न मिळणारा हमीभाव तर कधी बँक व सावकारांच्या कर्जामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील २३ वर्षांत २९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या वर्षी आतापर्यंत तीन शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यापैकी मदतीसाठी केवळ १६७ शेतकरी आत्महत्याच शासनाने पात्र ठरविल्या आहेत. तर १२७ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरवली. त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही.

– जिल्ह्यात २००१ ते ऑक्टोंबर २०२३ या काळात तब्बल २९४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कुणी गळफास घेतला, कुणी विषारी औषध प्राशन केले, कुणी विहिरीत, तलावात उडी घेत जीवनप्रवास थांबविला.

– नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, पेरलेले पीक अपेक्षित प्रमाणात घरी न येण्याची शाश्वती, आर्थिक चणचण, बँकेच्या कर्जाचा वाढता डोंगर याची चिंता शेतकऱ्याला सतावत असते.

– कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण या आणि अशाच समस्यांच्या चक्रव्युहात साडपलेला शेतकरी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलतो.
महसूल विभागाला रिक्तपदांचे ग्रहण; एका तलाठ्याच्या खांद्यावर ६ गावांचा कारभार; ९५५ गावांसाठी फक्त १५७ तलाठी
– शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या समितीसमोर शासनाने लावलेल्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील अपात्र १२७ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अद्यापही न्याय मिळू शकला नाही.

– जिल्ह्यात २०१५ व १६ या वर्षी सर्वाधिक आत्महत्या झाल्या. दोन वर्षांतील ६२ आत्महत्यांपैकी केवळ २० पात्र ठरल्या असून ४२ अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत.

– आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून १ लाख रुपयांची मदत मिळते. जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ६७ लाख रुपये शासनातर्फे पात्र असलेल्यांना देण्यात आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed