कोल्हापूर: पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली नोकरी मिळाल्याची ऑर्डर घेऊन येण्यासाठी गेलेल्या महिलेचा घरी येताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जयश्री दीपक नाईक (४७) राहणार शिरोली तालुका हातकणंगले असे दुर्देवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयश्री नाईक यांचे पती पाटबंधारे विभागात नोकरीसाठी होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. यानंतर मृत जयश्री यांनी सतत पाठपुरावा करून अनुकंपाखाली नोकरी मिळवली. दरम्यान या नोकरीची ऑर्डर घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी ही ऑर्डर घेऊन दुचाकीवरून घरी परतत असताना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर केदारगाव येथून कोल्हापूरकडे जाणाऱ्या टेम्पोने जयश्री नाईक यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली.

ही धडक इतके जोराची होती की धडकेत जयश्री देसाई या गाडीवरून खाली कोसळल्या. त्यामुळे टेम्पोच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या बाजूने जात असलेल्या दुचाकीस्वार नेताजी शिवाजी कांबळे राहणार पट्टणकोडोली तालुका हातकणकले हे अपघातात जखमी झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे