• Sat. Sep 21st, 2024

बोंड अळीमुळे कपाशीचं नुकसान; शेतकऱ्यांनी शेतात मेंढ्या सोडून ३ एकरवरील कापूस उपटून फेकला

बोंड अळीमुळे कपाशीचं नुकसान; शेतकऱ्यांनी शेतात मेंढ्या सोडून ३ एकरवरील कापूस उपटून फेकला

जळगाव: आधीच अस्मानी व सुलतानी संकट तर दुसरीकडे कापसाला भाव मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर आता बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ संकट कोसळले आहे. सततच्या नुकसानाला कंटाळून जळगावातील भडगाव तालुक्यातील कजगावमधील शेतकऱ्यांनी तब्बल तीन एकरवरील कापसाचे पीक उपटून फेकलं आहे.

बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कजगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कापसाचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या तीन एकरावरील पिकामध्ये चरण्यासाठी मेंढ्या सोडून देत त्यानंतर संपूर्ण तीन एकरवरील कापूस उपटून फेकला.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळी परिस्थितीतील नुकसान भरपाई पीक विम्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्याला अदा करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना थोड्या फार प्रमाणात का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed