• Sat. Sep 21st, 2024

PMP Bus: गो अ‍ॅपला पीएमपीकडूनच ‘खो’; नोव्हेंबर महिना संपत येऊनही सुरुवात नाही

PMP Bus: गो अ‍ॅपला पीएमपीकडूनच ‘खो’; नोव्हेंबर महिना संपत येऊनही सुरुवात नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांच्या सोयीसाठी ‘यूपीआय’द्वारे पैसे भरून तिकीट घेण्याची सोय केल्यानंतर या महिन्यात ‘पीएमपी गो’ नावाचे अॅप सुरू केले जाणार होते. प्रवाशांना बसची माहिती घरबसल्या मिळेल आणि अॅपवरूनच तिकीट तिकीट काढता येईल, अशा सुविधा त्या अॅपमध्ये असणार आहेत; पण नोव्हेंबर संपत आला तरीही अद्याप हे अॅप सुरू झालेले नाही.

पीएमपीने सर्व बसमध्ये ‘यूपीआय’च्या माध्यमातून तिकीट काढण्याची सोय केली आहे. तिला प्रतिसादही वाढतो आहे. पीएमपीकडून प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यात ‘पीएमपी गो’ नावाचे अॅप तयार करण्यात आले आहे. ते नोव्हेंबरमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार होते. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना बसची घर बसल्या सर्व माहिती मिळणार आहे. तसेच, त्यांना बसचे नेमके ठिकाणही समजणार आहे. प्रवासी घर बसल्या प्रवास करायच्या मार्गाचे तिकीट काढू शकतील. पीएमपीच्या सर्व मार्गांची माहितीदेखील यावर मिळणार आहे. बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे विविध पास अॅपद्वारे ऑनलाइन काढण्याची सोय आहे.
ना विमान, ना ट्रॅव्हल्स… दिवाळीत ‘समृद्धी’च! महामार्गावरुन विक्रमी संख्येने धावल्या कार
अॅप सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करणारे पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली झाल्यानंतर अॅपची प्रक्रिया मंदावली असल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी अद्याप प्रवाशांसाठी अॅप सुरू झालेले नाही.

पीएमपीचा पदभार घेतल्यानंतर सर्व माहिती घेत आहे. पीएमपी गो अॅपबाबत माहिती घेतली आहे. त्याच्यावर काम सुरू असून पुढील महिन्यात हे अॅप प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. – डॉ. संजय कोलते अध्यक्ष, पीएमपी

अॅपमधील संभाव्य सुविधा

– प्रवाशांना बसची सर्व माहिती घर बसल्या मिळेल
– बसचे नेमके ठिकाणही समजणार
– घरातूनच प्रवास करायच्या मार्गाचे तिकीट काढता येणार
– पीएमपीच्या सर्व मार्गांची माहिती मिळणार
– बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे विविध पास अॅपद्वारे काढता येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed