• Sat. Sep 21st, 2024

राजस्थान-छत्तीसगडमध्ये ४५० रुपयांना सिलिंडर देणार, महाराष्ट्राने काय पाप केलंय? : नाना पटोले

राजस्थान-छत्तीसगडमध्ये ४५० रुपयांना सिलिंडर देणार, महाराष्ट्राने काय पाप केलंय? : नाना पटोले

मुंबई : राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देऊ अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजपाचे मोठे नेतेही ४५० रुपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केले आहे का? असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यात बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकारला शेतकरी, बेरोजगार तरुण, सर्वसामान्य जनतेच्या भावना कळत नाही पण जनतेला भेडसावत असलेले मुळ प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे असल्याचं म्हटलं.

महाराष्ट्राने काय पाप केले आहे का?

ते म्हणाले, “राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देऊ ही सर्व भाजपची बनवाबनवी आहे. उज्ज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जातात ही योजना फेल गेली आहे पण उज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले आहे. नफा कमावणे हे सरकारचे काम नाही पण २०१४ पासून सरकार नफा कमावण्याचे काम करत आहे, जनतेची लूट करुन नफा कमावणे हे भयावह आहे”.

मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप
सरकार मुद्दामहून मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावतंय

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे सरकार म्हणत आहे तर सरकार नेमके काय करणार हे जनतेसमोर स्पष्ट करावे. पण सरकारची भूमिकाच स्पष्ट नाही. दोन्ही समाजात सुरु असलेला वाद हा सरकार प्रायोजित असून आरक्षणावरुन सुरु असलेला हा धुमाकुळ सरकारने थांबवावा, असं नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय, राज्य सरकार मराठा-ओबीसी वाद लावण्यात व्यस्त : नाना पटोले
आरक्षणप्रश्नावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे- जातनिहाय जनगणना करा

भाजपा हा आरक्षण विरोधी पक्ष असून देशाचे पंतप्रधानच गरिबी ही जात असल्याचे सांगून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षणप्रश्नावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात. काँग्रेस सत्तेत आल्यास तसा निर्णय घेतला जाईल असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

मराठा – ओबीसी नेते आमने सामने, दोन्ही समाजातील लोकांना नेमकं काय वाटतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed