• Mon. Nov 25th, 2024

    धनगर प्रश्नांबाबत काही अधिकाऱ्यांचे मुद्दाम असंवेदनशील वर्तन, पडळकरांचे फडणवीसांना पत्र

    धनगर प्रश्नांबाबत काही अधिकाऱ्यांचे मुद्दाम असंवेदनशील वर्तन, पडळकरांचे फडणवीसांना पत्र

    मुंबई : धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावीत अशी विनंती करणारे पत्र भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत काही अधिकारी हेतुपुरस्पर असंवेदनशीलपणे वागत आहेत. यातून धनगर समाजाला चिथावून पुन्हा राज्य अस्थिर करण्याचा काही अधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच आंदोलनातल्या ३६ समाजबांधवांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे आपण तात्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती पडळकरांनी पत्रातून फडणवीसांकडे केली आहे.

    काय आहे पत्र?

    प्रति,
    मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
    उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री,
    महाराष्ट्र राज्य.

    विषय- धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आणि धनगर योद्ध्यांवरील गुन्हे मागे घेणे बाबत…

    महोदय,
    गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाज आपल्या संविधानिक अधिकारापासून वंचित आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला. मात्र, महाआघाडी सरकारने हेतुपूर्वक ‘धनगड’ आणि ‘धनगर’ असा गोंधळ निर्माण केला. राज्यात आपले महायुतीचे सरकार आहे. या सरकारकडून धनगर आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. मात्र, आरक्षण अंमलबजावणीसाठी ५० दिवसांची मुदत उलटून गेली आहे.

    शरद पवार गटातील चौघांची खासदारकी रद्द करा, अजितदादा गटाची याचिका, कोणाकोणाची नावं?
    मुदत संपल्यानंतर धनगर आरक्षण प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही राज्यभर एक उपक्रम राबवला. दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यातील प्रत्येक तहसिलदार, प्रांत, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आरक्षण अंमलबजावणीसाठीची निवेदने देण्यात आली. संपुर्ण राज्यभरात शांततेत हा उपक्रम पार पडला. प्रशासनानेही याला जबाबदारीने प्रतिसाद दिला त्यांचे मी आभार मानतो.

    जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्री.कृष्णनाथ पांचाळ यांना निवदेन देण्याच्या १ दिवस आधी याची माहिती देण्यात आली होती. त्यांनी निवेदन स्वीकारण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी निवेदन स्वीकारले नाही.

    मोदींविरुद्ध नकारात्मक टिप्पणी, राहुल गांधींनी घोडचूक केली? भाजपला ‘फुल टॉस’ दिल्याची चर्चा
    त्यांनी संवेदनशीलपणे हा विषय हाताळणे गरजेचे होते. मात्र त्यांनी हेतूपूरस्पर समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले म्हणूनच आम्हा धनगर योद्ध्यांच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. यासाठी सर्वस्वीपणे जालन्याचे जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई केली जावी.

    त्याचप्रमाणे मी व समाजातील जाणत्यांनी वातावरण चिघळू नये यासाठी प्रयत्न केले परंतु पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशाने ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील काही व्यक्ती तर धनगर समाजातील नाहीत. काही प्रत्यक्षदर्शी ओबीसी बांधवांवरही गुन्हे दाखल केले. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा आम्हा धनगर – बहुजन बांधवांवर असलेल्या आकसाचा मी जाहीर निषेध करतो.

    भाजपच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा ‘हिंदू हृदय सम्राट’ उल्लेख, ठाकरे गटाची सडकून टीका
    कुठेही हिंसाचार होत असेल तर त्याचा मी निषेध करतो. आंदोलने शांततेच्या मार्गानेच व्हावी ही धनगर समाजाची भूमिका आहे. परंतु धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत जर काही अधिकारी हेतुपुरस्पर असंवेदनशीलपणे वागत आहेत. यातून धनगर समाजाला चिथावून पुन्हा राज्य अस्थिर करण्याचे काही अधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच आंदोलनातल्या ३६ समाजबांधवांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे आपण तात्काळ आदेश द्यावे. ही विनंती.

    यळकोट यळकोट, जय मल्हार…

    गोपीचंद पडळकर
    विधान परिषद सदस्य

    राजधर्माची आठवण करून दिली, गोपीचंद पडळकरांचा थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा

    Read Latest Maharashtra Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed