• Sun. Sep 22nd, 2024
भाजपच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा ‘हिंदू हृदय सम्राट’ उल्लेख, ठाकरे गटाची सडकून टीका

मुंबई : राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा नुकत्याच थंडावल्या. त्यापूर्वी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी विशाल रॅली काढण्यात आली. परंतु भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या पोस्टर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदू हृदय सम्राट’ असा केल्यामुळे ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे.

“पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच…. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार!” अशा शब्दात ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे गटाचा समाचार घेण्यात आला आहे.

शरद पवार गटातील चौघांची खासदारकी रद्द करा, अजितदादा गटाची याचिका, कोणाकोणाची नावं?
राजस्थानमधील हवामहल विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज (हाथोज धाम) यांच्या प्रचारासाठी काल एकनाथ शिंदे गेले होते. यावेळी शास्त्री नगर भागापासून भाजप कार्यालयापर्यंत विशाल वाहन रॅली काढण्यात आली.

मोदींविरुद्ध नकारात्मक टिप्पणी, राहुल गांधींनी घोडचूक केली? भाजपला ‘फुल टॉस’ दिल्याची चर्चा
यासंबंधी माहिती देणाऱ्या पोस्टरच्या सर्वात वर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, वसुंधरा राजे यांच्यासह काही भाजप नेत्यांचे फोटो आहेत. त्याखाली ‘हिंदू हृदय सम्राट माननीय एकनाथ शिंदे जी का हवामहल की पावन धारा पर हार्दिक स्वागत’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यावरुन ठाकरे गटाने टीकेची झोड उठवली आहे.

एकनाथ शिंदेंची राजस्थानात क्रेझ, जयपूरमध्ये जंगी स्वागत

Read Latest Mumbai Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed