• Thu. Nov 28th, 2024

    शिवसेना आमदारांची अपात्रता सुनावणी कधीपर्यंत चालणार? विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

    शिवसेना आमदारांची अपात्रता सुनावणी कधीपर्यंत चालणार? विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी १८ दिवस चालणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिली. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटांसमोर वाचून दाखवतानाच या प्रकरणाची सुनावणी नागपूर येथेही होणार असल्याचे स्पष्ट केले.

    शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांच्याकडून उलटतपासणी सुरू असून, बुधवारीदेखील ही उलटतपासणी झाली. सुनावणी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणीच्या गतीवरून नाराजी व्यक्त केली होती. माझ्याकडे केवळ १६ दिवस सुनावणीसाठी असून, या प्रकरणाची सुनावणी संपवून मला निर्णय घ्यायचा आहे, असे नार्वेकर म्हणाले. ‘मला ३१ डिसेंबरपर्यंत या प्रकरणांची सुनावणी संपवायची आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि अधिवेशन कालावधी वगळता माझ्याकडे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याकरिता केवळ १६ दिवसांचा कालावधी असल्याचे त्यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले होते,’ असे सांगून विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले.

    ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला यश, पण अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून नको ते घडलं, शेट्टींकडून दिलगिरी
    आमदार अपात्रता सुनावणी १८ दिवसांमध्ये चालणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटांसमोर वाचून दाखवल्या. त्यानुसार २८, २९ आणि ३० नोव्हेंबर अशी सुनावणी होईल. त्यानंतर १, २, ५, ६ आणि ७ डिसेंबर अशी सुनावणी होईल. त्यानंतर ११ ते १५ डिसेंबर; तसेच १८ ते २२ डिसेंबर अशी सलग सुनावणी होईल.

    हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून सुरू झाल्यास ११ डिसेंबरपासून सुनावणी नागपूरला होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. एकूण १८ दिवसांत सुनावणी पूर्ण करायची आहे. हातात असलेले दिवस आणि तारखा यांची यादी दोन्ही गटांसमोर नार्वेकर यांनी वाचून दाखवली. यापुढे सार्वजनिक सुट्ट्या मिळून या तारखा आता सुनावणीसाठी असणार आहेत. हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून सुरू होणार की ११ डिसेंबरपासून सुरू होईल, याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

    नार्वेकर- फाटक यांच्या एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीबाबत काय म्हणाले सुनील प्रभू?

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed