• Sat. Sep 21st, 2024
भरधाव ट्रेलरची पादचारी महिलांना जोरदार धडक, भीषण अपघातात एकीचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. कोल्हापुरातील पुईखडी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाता काही तास उलटत नाही तोवर, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. भरधाव येणाऱ्या अवजड वाहनांमुळे हे अपघात अलीकडे घडू लागले आहेत. असाच एक भीषण अपघात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यात आंजणारी येथे झाला आहे.

भरधाव ट्रेलरने दोन पादचारी महिलांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर यातील एका ३५ वर्षे महिलेचा या अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. पल्लवी प्रकाश पेंढारी (वय ३५, रा. अंजनारी पेंढारी वाडी, ता. लांजा) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग लांजाजवळ आंजणारी घाट येथे हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातत ट्रेलर गाडी नंबर एचआर ३८ व्ही ९७९४ वरील चालक सद्दाम हकिमुदिम अन्सारी (वय २६, रा. बिहार जि. कैमुर) या वाहनाने मुंबईकडून गोवाकडे जात असताना दोन पादचारी महिला यांना धडक दिली. या अपघातामध्ये पल्लवी प्रकाश पेंढारी यांचा जागीच मृत्यू झाला तर जयश्री धोंडीराम पेंढारी (वय ५२) या गंभीर जखमी झालेल्या आहेत.

गोवा-मुंबई खासगी बस कोल्हापुरात उलटली, पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचाराकरता खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र लांजा येथे पाठविण्यात आलेलं आहे. घटनास्थळी लांजा पोलिसांनी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली व जखमींना स्थानिकांच्या सहकार्याने मदत केली. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाही सुरु आहे. लांजा पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणाची कारवाही सुरू आहे.

करोनानंतर चीनमध्ये नवी महामारी? मुलांमध्ये पसरतोय गंभीर आजार; रुग्णालयं भरली, चिंता वाढली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed