• Sat. Sep 21st, 2024
कोर्टात पोहोचण्यास ३० मिनिटांचा उशीर, दोघा पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा

परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिस स्टेशनमधील हवालदार आणि हेड कॉन्स्टेबल सुट्टीकालीन कोर्टात ३० मिनिटे उशिरा पोहोचले. याबद्दल शिस्तभंगाचा ठपका ठेवत दोघांना आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा सुनावण्यात आली. दोघांनाही परिसरातील गवत छाटण्याचे काम सोपवण्यात आले होते.

वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे पोलिस रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांनी रविवार २२ ऑक्टोबर रोजी पहाटे मानवत येथे दोघा जणांना संशयास्पद अवस्थेत फिरताना ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या दोघांना सकाळी ११ वाजता सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते.

मात्र, संशयितांसह पोलिस सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास न्यायालयात पोहोचले. त्यामुळे त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेतला. त्यांनी दोघांनाही परिसरातील गवत कापण्याचे आदेश दिले.

अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, खंडणीखोर कृषी अधिकारी महिला लेकासह अटकेत, घरी १९ लाखांचं घबाड
या असामान्य शिक्षेमुळे अस्वस्थ झालेल्या हवालदारांनी ही बाब त्यांच्या वरिष्ठांना कळवली. त्यानंतर २२ ऑक्‍टोबर रोजी पोलिस स्टेशन डायरीत त्याची अधिकृतपणे नोंद करण्यात आली आणि त्याचा तपशीलवार अहवाल विभागातील उच्चपदस्थांना पाठवण्यात आला.

युक्रेनमधील महिलेशी पतीचे विवाहबाह्य संबंध, कल्याणमध्ये विवाहितेने आयुष्य संपवलं
परभणीचे प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी घटनेला दुजोरा दिला. “हे आमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, हवालदारांच्या जबाबासह सविस्तर अहवाल योग्य कारवाईसाठी न्यायव्यवस्थेकडे पाठवण्यात आला होता.” या घटनेचे साक्षीदार असलेल्या अन्य तीन हवालदारांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. मानवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी डायरीतील नोंदीला दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील देण्यास नकार दिला.

चोराने नवं अलिशान घर बांधलं, पण टीव्ही नसल्याने थेट चोरी; पोलिसांकडून अटक होताच स्वप्न अपूर्ण!

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed