• Sat. Sep 21st, 2024
बेकायदा राजकीय कंटेनर शाखेला विरोध; अन्य पक्ष मनपा आयुक्तांच्या भेटीला, शिंदे गटाचे कार्यालय अडचणीत

मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरमधील शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनरमध्ये सुरू केलेल्या बेकायदा शाखेला विरोध दर्शवत त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्य राजकीय पक्षांनी सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. बेकायदा राजकीय कार्यालयांवरील कारवाई संदर्भातील जुन्या ठरावानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. अन्य राजकीय पक्षांचीही शहरात अनेक बेकायदा कार्यालये असल्याने त्यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे.
जुगार खेळत असल्याचा बावनकुळेंचा फोटो राऊतांकडून शेअर; फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
मिरा-भाईंदर शहराच्या विविध भागांत रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत शिवसेनेच्या शिंदे गटाने कंटेनरमध्ये शाखा उभारल्या आहेत. या कंटेनर शाखा बेकायदा असल्याचे सांगत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मनसे इत्यादी राजकीय पक्षांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला आहे. या मुद्द्यावर आंदोलनेही झाली. सोमवारी सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेतली. शिंदे गटाच्या बेकायदा शाखांवर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर, राजकीय पक्षांच्या बेकायदा कार्यालयांवरील कारवाई संदर्भात याआधी महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आयुक्त काटकर यांनी त्यांना दिले.

मात्र महापालिकेने यानुसार कारवाई केल्यास, शिंदे गटासह विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ५५ कार्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अन्य राजकीय पक्षांपुढेच अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची भूमिका मवाळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंच्या नुरा कुस्तीमुळे ओबीसी आणि मराठा समाजाचं नुकसान : सुषमा अंधारे

सामान्य नागरिकांनी बेकायदा बांधकाम केल्यास महापालिका प्रशासनाकडून तात्काळ त्यावर कारवाई केली जाते. विविध राजकीय पक्षांनी उभारलेल्या बेकायदा कार्यालयांवर मात्र मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महापालिकेची भूमिका राजकीय पक्षांसाठी वेगळी आणि सर्वसामान्यांसाठी वेगळी असल्याची टीका नागरिक करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या शहरातील सर्वच बेकायदा कार्यालयांवर कारवाई व्हायला हवी, असे मत जागरूक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed