• Sat. Sep 21st, 2024
Mumbai Lower Parel: पुलावरील बससेवा पुन्हा सुरू कराव्यात, लोअर परळमधील रहिवाशांची मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोअर परळ पुलाचे काम पूर्ण झाले असून, येत्या तीन ते चार दिवसांत दुसरी मार्गिका सुरू करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलावर वरळी कोळीवाडा, शिवडी, वडाळादरम्यान जाणाऱ्या बेस्टच्या बस सेवेचे थांबे पुन्हा बसवून बससेवा सुरू करण्याची मागणी लोअर परळ परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

लोअर परळ नवीन पुलाचे बांधकाम सन २०१८मध्ये सुरू करण्यात आल्यानंतर पुलावरून जाणारी बेस्ट बसची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. तसेच लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेर दुतर्फा असलेले बेस्टचे थांबे हटविण्यात आले. या पुलावरून वरळी कोळीवाडा, दादर, शिवाजी पार्क, दादर-वडाळा-लालबाग- परळमार्गे (केईएम, गांधी, वाडिया, टाटा, पशू रुग्णालय) एम.डी. कॉलेज, शिवडी प्रबोधनकार ठाकरे आगारापर्यंत बससेवा सुरू होती. रहिवाशांना या सर्व ठिकाणी बेस्टच्या बसव्यतिरिक्त दुसरा स्वस्त मार्ग नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना परळ रुग्णालयांत जाण्यासाठी या बसचा खूप मोठा आधार होता. तसेच कॉलेज विद्यार्थ्यांनाही बसने जाणे सोयीस्कर होते.

फायनलसाठी भारतीय संघात होणार मॅचवनिर खेळाडूची एंट्री, रोहित शर्माची सर्व चिंता मिटली…
लोअर परळ पूल नव्याने बांधण्यात आल्यानंतर ही बससेवा पुन्हा सुरू झालेली नाही. ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. जुना पूल पाडल्यानंतर यातील काही बससेवा पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्यात आल्या होत्या. बांधकाम सुरू असल्याने नागरिकांनीही संयम ठेवला होता. आता या बस पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, असा त्यांचा आग्रह आहे.

‘पूर्व-पश्चिमेला जोडणारे एस्कलेटर सुरू व्हावे!’

लोअर परळचा पूल सुरू झाला, पण पूर्व-पश्चिम दोन्ही ठिकाणी जायचे असल्यास दोन्ही बाजूंच्या नागरिकांना लोअर परळचा अजस्र पूल ओलांडावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी तर गेली पाच वर्षे इथून तिथे जाणेच सोडले आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिमेला जोडणारे एस्कलेटर तातडीने सुरू करण्यात यावेत, अशीही स्थानिकांची मागणी आहे.

रोहित शर्माला मिचेल स्टार्कने दिलं ओपन चॅलेंज, म्हणाला पहिल्याच पॉवर प्ले मध्येच आम्ही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed