• Mon. Nov 25th, 2024

    Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा महासंप; डिसेंबर-जानेवारीत १३ दिवस बॅंक राहणार बंद, जाणून घ्या तारखा

    Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा महासंप; डिसेंबर-जानेवारीत १३ दिवस बॅंक राहणार बंद, जाणून घ्या तारखा

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नवीन पदभरती, आउटसोर्सिंग बंद करून कायमस्वरूपी कर्मचारी ठेवा या मागण्यांच्या समर्थनार्थ बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. येत्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देशभर होणाऱ्या या महासंपामध्ये एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत.

    गेल्या काही वर्षांत बँकांमध्ये खालच्या स्तरावर आउटसोर्सिंगचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत तात्पुरते कामगार वाढल्याने ग्राहकांची वैयक्तिक माहितीही धोक्यात आली आहे. मुख्य म्हणजे सर्वच बँकांमधील मनुष्यबळ कमी झाले आहे. सेवानिवृत्ती, मृत्यू यांमुळे पदे रिक्त होत आहेत. त्या रिक्त पदांची पूर्तता होत नसल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. परिणामत: नवीन पदभरती व्हावी तसेच आउटसोर्सिंगऐवजी कायमस्वरूपी कर्मचारी ठेवण्यात यावेत, या दोन मुख्य मागण्या संपाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. यासाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने (एआयबीईए) बँक कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ यादरम्यान बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. असोसिएशनच्या अधिसूचनेनुसार, ४ डिसेंबर ते २० जानेवारी या कालावधीत विविध तारखांना कर्मचारी आपल्या विविध मागणीसाठी संप करतील. पहिल्या टप्प्यात ४ ते ११ डिसेंबरदरम्यान एकेका दिवशी काही ठराविक बँकांच्या देशभरातील शाखांमधील कर्मचारी संपावर जातील. तर जानेवारीत २ ते ६दरम्यान एका ठराविक दिवशी काही ठराविक राज्यांतील सर्व बँकांच्या सर्व शाखांमधील कर्मचारी संप पुकारतील. तसेच १९ आणि २० जानेवारीला देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

    कधी, कुठे?

    ४ डिसेंबर : पीएनबी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब अॅण्ड सिंध बँक
    ५ डिसेंबर : बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया
    ६ डिसेंबर : कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया
    ७ डिसेंबर : इंडियन बँक, युको बँक
    ८ डिसेंबर : युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र
    ११ डिसेंबर : खासगी बँका

    २२ जानेवारीला राम मंदिर दर्शनाासाठी खुलं होणार, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    राज्यनिहाय वेळापत्रक

    २ जानेवारी : तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप.
    ३ जानेवारी : गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीव.
    ४ जानेवारी : राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड.
    ५ जानेवारी : दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश.
    ६ जानेवारी : पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम.
    १९ आणि २० जानेवारी : या दोन तारखांना देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जातील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *