एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरून समाजात तीव्र भावना आहेत याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, यावर मी भाष्य करणार नाही. मात्र आपल्या राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये. जे कोणी राजकीय पुढारी सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते निंदनीय आहे. आपण खेळीमेळीने गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे.. हे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र सरकार गेल्यामुळे ते टिकवता आले नाही. माझी खात्री आहे की, आमचं सरकार असतं तर आरक्षण टिकवलं असतं. मात्र सरकारला अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करून महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळ फेकली की काय हा प्रश्न आहे. आज मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन कोणत्या आधारावर आश्वासन दिलेलं आहे. सामाजिक स्वास्थ कायम राहून हा प्रश्न कसा सोडवणार आहोत यासाठी वेळ दिला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले…
महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आले नाही असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना चव्हाण म्हणाले की, यावर फार खोलात जायचं कारण नाही. मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ दिला पाहिजे. जेव्हा सरकार सांगेल आम्हाला जमलं नाही तेव्हा नवीन वेळ येईल तेव्हा बघू, असं ते म्हणाले. संभाजीराजे छत्रपतींनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनामाची मागणी केली आहे यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, माझं स्पष्ट मत आहे की समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य होता कामा नयेत. हा प्रश्न रस्त्यावर सुटणारा नाही. रस्त्यावर सोडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर.. महाराष्ट्राच्या दृष्टीने ते दुर्दैवी आहे. कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडविला पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
आरक्षणावरून दोन समाजाला खेळवण्याचा कार्यक्रम केला जात आहे. ३ डिसेंबर नंतर राज्याची परिस्थिती भयावह होईल.. या प्रश्नावर बोलताना चव्हाण म्हणाले की, दोन समाजाला भिडवण्याचे काम ज्या कोणी व्यक्तीने केले असेल त्याला जाब विचारावा.. पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, मला खात्री आहे की बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येईल.
Read Latest