• Mon. Nov 25th, 2024

    मराठा समाज मागास आहे का? राज्य मागासवर्ग आयोग चाचपणी करणार, मुख्यमंत्र्यांचं पत्र

    मराठा समाज मागास आहे का? राज्य मागासवर्ग आयोग चाचपणी करणार, मुख्यमंत्र्यांचं पत्र

    पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाला तसं पत्र दिले आहे. या बैठकीत मराठा समाज मागास आहे का? याची चाचपणी करण्यात येणार आहे. १३ नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाला पत्र पाठवलं आहे. या बैठकीला उद्या राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासहित १० सदस्य उपस्थित राहणार आहेत. उद्या या बैठकीत मागासवर्गीय आयोग कार्य पद्धती ठरवणार आहे.

    राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ मागितला होता. त्यानुसार आता सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. एकीकडे मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे सरकारने देखील जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

    मराठा समाज मागास आहे की नाही याची चाचणी करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्या पुण्यात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये मराठा समाज मागास आहे का याची चाचणी होणार आहे. तर मागास ठरवण्यासाठी काय कार्यपद्धती असावी याच्यावर देखील उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे. पुण्यात उद्या अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून या बैठकीकडे आता संपूर्ण राज्याच लक्ष लागला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed