• Mon. Nov 25th, 2024

    नीलेश लंकेंचं निमंत्रण, विखेंचे विरोधक एकवटले, लोकसभेआधीच बापलेकाचं टेन्शन वाढलं!

    नीलेश लंकेंचं निमंत्रण, विखेंचे विरोधक एकवटले, लोकसभेआधीच बापलेकाचं टेन्शन वाढलं!

    अहमदनगर : आमदार नीलेश लंके तुम्ही अहंकार रुपी रावणाला खाली बसवा, तुम्हाला रामाची (राम शिंदे) साथ आहे, अशी जोरदार फटकेबाजी विखेंचे कट्टर विरोधक, नेते विवेक कोल्हे यांनी केली. दिवाळी फराळाच्या निमित्ताने लंकेच्या आमंत्रणाला मान देऊन राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यानिमित्ताने विखे पाटलांचे विरोधक एकवटल्याने त्यांची वज्रमूठ पाहायला मिळाली.

    वनवासातून श्रीराम ठिकाणी परतले होते. एक राक्षस रुपी रावणाचा वध करून आल्यामुळे संपूर्ण परिसरात दिवे लावून दीपोत्सव किंवा दिवाळी केली गेली. तोच दिवस साजरा करण्यासाठी आपणही दिवाळी साजरी करतो. अहंकार रुपी रावण स्वरूपातील जे काही लोक समाजात असतील, त्यांना खाली बसण्यासाठी आपण सर्वांनी देव माणूस असलेल्या निलेश लंकेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असून आमदार लंके तुम्ही अशा अहंकार रुपी रावनांना खाली बसवा, तुम्हाला शिंदे यांच्या रूपाने रामाची साथ देखील आहे, असे म्हणत कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनीविखे पिता पुत्राचे नाव न घेता टोला लागवला.

    पारनेर येथे आमदार निलेश लंके यांनी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार राम शिंदेंसह विवेक कोल्हे देखील उपस्थित होते. यावेळी विवेक कोल्हे यांनी विखे विरोधकांची वज्रमूठ घट्ट करून लोकसभेच्या तोंडावर विखेंचं टेन्शन चांगलंच वाढवलं.

    या दोन्ही नेत्यांकडे साखर कारखाने नाहीत. त्यामुळे आम्ही दोघे विकत घेऊन साखर वापरतो. कमी पडली, तर विवेक कोल्हे आहेतच. शब्दाला आम्ही दोघे पक्के आहोत. त्यामुळे सुरुवात आपणच करणार आणि शेवटदेखील आपणच करणार, असे शाब्दिक फटाके आमदार राम शिंदे यांनी दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात फोडले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed