– १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूकीतून ३२८,४०,०२,००० रुपयांचा अर्थात ३२८ कोटी ४० लाख दोन हजार रुपये इतका महसूल मिळवला आहे.
– गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२२ मध्ये महामंडळाने २३१ कोटींचा महसूल मिळवला होता.
– भाऊबीजेच्या मुहूर्तावर प्रवाशांनी यंदा एसटीला तब्बल ३१ कोटी ६० लाखांची ओवाळणी दिली आहे.
– ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान महामंडळाचे किमान उत्पन्न २१ कोटी आणि कमाल उत्पन्न ३१ कोटी होते.
– मुंबई महानगर प्रदेशातून ५५ कोटी २ लाखांचा महसूल महामंडळाच्या तिजोरीत जमा केला आहे.
– मुंबई महानगरात ठाणे विभागाने १३ कोटी ६७ लाखांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले आहे.
– मुंबई महानगरातून सर्वात कमी उत्पन्न सिंधुदुर्ग विभागाचे (५ कोटी १४ लाख) आहे.
– सहा प्रदेशापैकी पुणे प्रदेशाने ८१ कोटीं ६१ लाखांचा सर्वाधिक महसूल महामंडळाला दिला आहे.
– अमरावती प्रदेशाने सर्वात कमी अर्थात ३२ कोटी २२ लाखांचा महसूल मिळवला आहे.
– राज्यातील ३१ विभागांपैकी पुणे विभागाने २१ कोटी ४४ लाखांचे उत्पन्न मिळवून अग्रकमांकाचा मान पटकावला आहे.
– सर्वात कमी उत्पन्न गडचिरोली विभागाने (३ कोटी ८२ लाख) प्राप्त केले आहे.
Read Latest Mumbai Updates And Marathi News