• Sat. Sep 21st, 2024

विधानसभेपूर्वीच भाजप आमदारांमध्ये कोल्डवॉर, सोलापूरच्या देशमुखांचे नेमकं चाललय काय? जोरदार चर्चा

विधानसभेपूर्वीच भाजप आमदारांमध्ये कोल्डवॉर, सोलापूरच्या देशमुखांचे नेमकं चाललय काय? जोरदार चर्चा

सोलापूर: सोलापुरातील सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात भाजपच्या दोन आमदारांमधील शीतयुद्ध समोर आले आहे. सोलापूर शहर उत्तर मधील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख हे दोन्ही नेते एका कार्यक्रमादरम्यान समोरासमोर आले होते. भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सर्वांना हस्तांदोलन केले मात्र, दुसरे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना हस्तांदोलन न करताच ते व्यासपीठावरून निघून गेले. भाजपच्या दोन्ही आमदारांनी हस्तांदोलन करणे टाळल्याने हे प्रकरण व्यासपीठावर व प्रेक्षकांत चर्चेचा विषय ठरला.

सत्कार झाल्यानंतर हस्तांदोलन न करताच निघून गेले:
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुभाष देशमुख हे सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमात असणाऱ्या मान्यवरांशी हस्तांदोलन करत होते . यावेळी भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. मात्र, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी हस्तांदोलन न करताच निघून गेले. यावेळी भाजपच्या दोन्ही आमदारांचे शीतयुद्ध समोर आले. सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात दोन्ही आमदारांच्या हस्तांदोलनाची चर्चा रंगली.

भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स हे नविन खातं उघडलं असावं,रामलल्लाच्या मोफत दर्शनावरुन राज ठाकरेंचा जोरदार टोला
सोलापूर महानगरपालिकेतदेखील देशमुखांचे दोन गट:

सोलापूर महानगरपालिकेत २०१७ साली सार्वत्रिक निवडणूका झाल्या होत्या. त्यावेळी सोलापूर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली होती. जवळपास ४९ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते.त्यामधील १४ नगरसेवक हे सुभाष देशमुख गटाचे होते तर बाकी नगरसेवक हे विजयकुमार देशमुख गटाचे भाजपचे नगरसेवक होते.भाजपच्या दोन्ही आमदरांच्या गटबाजीमुळे सोलापूर महानगरपालिकेत देखील सावळा गोंधळ पाहायला मिळाला होता.सुभाष देशमुख गटाकडून अडीच वर्षे शोभा बनशेट्टी महापौर झाल्या होत्या तर विजयकुमार देशमुख गटाकडून श्रीकांचना यण्णम महापौर झाल्या होत्या.

आरक्षण मिळाल्यावर तुमचे ऋण समाज कधीही विसरणार नाही, जरांगेंच्या चार मिनिटांच्या सभेने रेकॉर्ड तोडले!

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed