• Mon. Nov 25th, 2024
    हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबला, पोलीस कॉन्स्टेबलने आयुष्य संपवलं; भाऊबीजेच्या पहाटे अनर्थ

    सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट हे पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. सोलापूर शहर पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने सोलापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी राहुल शिरसट यांना मृत घोषित केले आहे.

    सुरक्षेसाठी राहुल शिरसट यांच्याकडे नेहमी SLR रायफल होती. ड्युटी संपल्यानंतर राहुल रायफल जमा करत होते. आज बुधवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर राहुल यांनी रायफल जमा न करता, रायफल घरी घेऊन गेले. केशव नगर पोलीस वसाहतीत त्यांनी राहत्या घरी हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबला. रायफलच्या आवाजाने केशव मगर पोलीस वसाहत हादरली. भाऊबीज असल्याने केशव नगर पोलीस वसाहतीत मोठ्या आनंदाचे वातावरण होते. राहुल यांनी अज्ञात कारणावरून पोलीस वसाहतीत रायफलची गोळी झाडून आत्महत्या केली. आजूबाजूला राहत असलेल्या पोलिसांनी राहुल यांच्या रूमकडे धाव घेतली. त्यावेळी राहुल शिरसट हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

    भायखळाच्या मदनपुरा भागात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी, ५ जणांना वाचवण्यात यश
    राहुल शिरसट हे २०११ साली मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. २०१७ साली सोलापूर शहर पोलीस दलात त्यांची बदली झाली होती. राहुल शिरसट सोलापूर शहर पोलीस दलात बदली होऊन आल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली होती. प्रशासकीय कारणास्तव राहुल यांची बदली मुख्यालयात झाली होती. पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर अनेक महिन्यांपासून राहुल सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होते. राहुल यांचे वडील सोलापूर पोलीस दलात अनेक वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. राहुल यांचा भाऊ देखील सोलापूर सिटी पोलीस दलात कार्यरत आहे. तर राहुल यांची पत्नी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. राहुल यांची बहीण महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी पदावर कार्यरत आहे. अख्ख कुटुंब पोलीस दलात कार्यरत असलेल्या राहुल यांनी भाऊबीजेला टोकाचं निर्णय घेत आत्महत्या का केली? याच कारण अद्याप समजू शकलं नाही.

    एकै महिन्यापूर्वी APIने आत्महत्या केली होती

    नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी API आनंद मळाले यांनी सोलापूर शहरातील कुमठा येथील राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. एक महिन्यानंतर सोलापूर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिरसट यांनी रायफलमधून आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दोन महिन्यांत दोन पोलिसांनी राहत्या घरी सर्विस रिव्हॉल्व्हर आणि रायफल मधून आत्महत्या केल्याने सोलापुरात एकच चर्चा सुरू आहे.

    महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? संभाव्य फॉर्म्युला समोर, कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed