• Sat. Sep 21st, 2024

दीपावलीच्या मुहूर्त साधला, वाशी मार्केटला हापूस आंब्याची पहिली पेटी कुणाची, जाणून घ्या

दीपावलीच्या मुहूर्त साधला, वाशी मार्केटला हापूस आंब्याची पहिली पेटी कुणाची, जाणून घ्या

सिंधुदुर्ग : दीपावलीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंब्याने वाशी आंबा मार्केटला हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा खवय्यांना देवगड हापूस चाखायला मिळणार आहे. देवगडमधील आंबा व्यापारी आणि बागायतदार मिलेश बांदकर यांनी वाशी मार्केटला आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान मिळवला आहे. हंगामाआधी वाशी मार्केटला देवगड हापूस आंब्याची पेटी पाठविण्यासाठी अनेक जण आंबा बागायतदार मोहोर टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

कोकणात हापूस आंब्याचा हंगाम सुरू व्हायला अजूनही पाच महिन्यांचा कालावधी आहे. मात्र, यावर्षीच्या हंगामातील पहिली पेटी विजयदुर्ग येथील रामेश्वर घरीवाडी येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी आणि बागायतदार मिलेश बांदकर यांची यावर्षीची पहिली सहा डझन हापूस आंब्याची पेटीची पूजन करून मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना केली आहे.

हापूस आंब्याला जागतिक स्तरावर पोहोचवणारे मिलेश बांदकर बंधूनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईला पाठवली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर काळात त्यांच्या आंबा कलम बागेत मोहर आला होता. हा मोहोर त्यांनी मेहनत करून वाचवला. याकाळात पाऊस होऊन सुध्दा कोणतेही झाडाला छप्पर न करता त्यांनी आलेला आंबा मोहोर वाचवला. त्यांच्या आंबा बागेत चार पेट्या आंबा अजून असून पुढील आठवड्यातच मुंबई वाशी येथे रवाना होणार असल्याचे मिलेश बांदकर यांनी सांगितले.
आंबा, काजू बागायतदारांची दिवाळी गोड! अखेर पाठपुराव्याला यश; नुकसान भरपाई मिळाल्याने बळीराजा सुखावला
सिंधुदुर्गात अजूनही अवकाळी पाऊस अधूनमधून पडत आहे. त्यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम काहीसा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रगतशील आणि प्रयोगशील आंबा बागायतदार मिलेश बांदकर यांनी आलेला मोहोर टिकवून ठेऊन त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यांनी या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी बाजारात पाठवली आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर दुःखाचा डोंगर; सहलीला आलेले विद्यार्थी समुद्रात उतरले अन् अनर्थ, तरुण बेपत्ता
कोकणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही महिने अगोदरच पहिली पेटी वाशी मार्केटला पाठविण्यात आली.जिल्ह्यातील मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील त्यांनी योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर मोहोर टिकवून फळांचे संरक्षण केले. योग्य त्या फवारण्या करून आणि विविध कीटकनाशक, बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या.त्यामुळे लवकर पेटी पाठवल्यामुळे आंबा बागायदार आणि व्यापारी मिलेश बांदकर यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
आधी छंद होता, आता व्यवसायात रुपांतर, चॉकलेट व्यवसायातून महिन्याला ४ ते ५ लाख..!

चिपळूण येथील महिला बचत गटांच्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत… स्टॉल्सवर ग्राहकांची गर्दीच गर्दी!

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed