• Sat. Sep 21st, 2024
‘आमच्याजवळ फटाके फोडू नका’, तरुणाची विनंती; मात्र टोळक्याला संताप अन् घडलं धक्कादायक कृत्य

डोंबिवली: आमच्या समोर फटाके फोडू नका, अशी विनंती ठाकुर्लीमधील एका तरुणाने केली. याचाच राग टोळक्याला आला. यावरून त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय बघून घेतो असे धमकावून हल्लेखोरांपैकी एकाने फायटरच्या साह्याने या तरुणावर हल्ला चढविला.
विहिरीच्या पाणी वाटपाचा वाद शिगेला; रक्तरंजित थराराने शेवट, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न, काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सकरूद्दीन शेख, मिथीलेश लोधी, राजू, रहिम या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. तर बबलू चव्हाण (२२) असे जखमी तरूणाचे नाव आहे. ठाकुर्ली ९० फिट रोडला रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली असून पत्रिपुल परिसरात राहणार बबलू चव्हाण हा पाणी विक्रीचा व्यवसाय करतो. रात्री तो ९० फिट रोडला असलेल्या मोहन सृष्टी इमारतीसमोर मित्र आदिल खान याच्यासोबत उभा होता. दरम्यान त्या ठिकाणी चोघेजण फटाके फोडत होते.

प्रश्न चुटकीत संपवतो, मला मुख्यमंत्री करा;संभाजीराजेंचं वक्तव्य चर्चेत

तुम्ही आमच्याजवळ फटाके फोडू नका, असे बबलू याने त्यांना सांगितले. याचा राज आल्याने त्या चौघांनी त्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी देखील दिली. यानंतर सकरुद्दीन याने त्याच्याजवळील फायटरने बबलू याला मारहाण केली आहे. बबलूने दिलेल्या तक्रारीच्या आधारे टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादवी कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed