Eknath Shinde: गेल्या आठवडाभरापासून राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीला दणदणीत बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिला. त्यानंतर दोन दिवसांनी ते कोणाशीच काही बोलले नाहीत. शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाबद्दल दिल्लीहून मेसेज आल्यानंतर ते नाराज असल्याची बातमी २५ नोव्हेंबरच्या रात्री आली. त्यानंतर शिंदेंनी २७ नोव्हेंबरला एक पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद वर्षावर घेण्यात आलेली नव्हती. शिंदेंनी त्यांच्या ठाण्यातील शुभदीप बंगल्यावर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
लाडक्या बहिणींचं महायुतीला जोरदार मतदान; नव्या सरकारमध्ये महिलांना खास स्थान, कोणाला संधी?
शिंदे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असताना वर्षावर बंगल्यावर तीन दिवस बरीच लगबग सुरु होती. शिंदे काल दिल्लीला होते. तेव्हाही वर्षावर बरीच लगबग दिसत होती. वर्षा बंगल्यावर वास्तव्यास असलेल्या शिंदे यांच्या कुटुंबाच्या सामानाची आवराआवर सुरु होती. सामानाची बांधाबांध केली होती. तीन दिवस सगळी आवराआवर सुरु होती. शिंदे कुटुंबाचं सामान त्यांच्या ठाण्यातील घरी पाठवण्यात आलं.
तीन दिवस लगबग, ‘वर्षा’वर लक्षवेधी हालचाली; अखेर त्यांना अश्रू अनावर, शिंदे निघताच ढसाढसा रडले
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या शिंदेंनी वर्षा बंगल्याचा निरोप घेतला. त्यानंतर वर्षावरील कर्मचारी वर्गाला रडू कोसळलं. शिंदे जवळपास अडीच वर्षे वर्षावर वास्तव्यास होते. कायम माणसांमध्ये राहणारा मुख्यमंत्री, लोकांमध्ये अगदी सहज मिसळणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख या कालावधीत निर्माण झाली. त्यामुळे शिंदेंनी बंगला सोडताच तिथल्या कर्मचाऱ्यांना गलबलून आलं. अनेकांचे डोळे पाणावले.
Eknath Shinde: सत्ता स्थापनेचा पेच असताना शिंदे अचानक गावाला रवाना; महायुतीची बैठक रद्द; नेमकं चाललंय काय?
राज्याच्या सत्ताकारणाचं केंद्र असलेला वर्षा बंगला सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा विषय राहिला आहे. या बंगल्यावर पोहोचणं सर्वसामान्यांना सहजासहजी शक्य होत नाही, असं म्हटलं जातं. पण गेल्या अडीच वर्षांत वेगळं चित्र दिसलं. साध्या कार्यकर्त्यांसाठीही वर्षा बंगला खुला होता. तिथे येणाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था होती. शिंदेंच्या भेटीसाठी येणारे कार्यकर्ते वर्षावरुन जेऊनच जायचे. वर्षावर गेलो होतो, तिकडेच जेऊन आलो, असं कार्यकर्ते आवर्जून सांगायचे.