• Sun. Sep 22nd, 2024

अंमली पदार्थ घेऊन व्यक्ती येणार; पोलिसांना गुप्त माहिती, सापळा रचला, अज्ञात तरुण दिसला अन्…

अंमली पदार्थ घेऊन व्यक्ती येणार; पोलिसांना गुप्त माहिती, सापळा रचला, अज्ञात तरुण दिसला अन्…

नवी मुंबई: खारघर सेक्टर- ३५ मध्ये एमडी हे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सापळा लावून जेरबंद केले आहे. जिशान अहमद आलम खान (२४) असे या तरुणाचे नाव असून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याजवळ असलेले ५५ ग्रॅम वजनाचे ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे मेफेड्रोन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे.
‘आमच्याजवळ फटाके फोडू नका’, तरुणाची विनंती; मात्र टोळक्याला संताप अन् घडलं धक्कादायक कृत्य
खारघर सेक्टर-३५ मधील साई क्रिस्टल बिल्डींगच्या समोरील रोडवर एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी आणि त्यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्रीपासून खारघर मधील क्रिस्टल बिल्डींगजवळ सापळा लावला होता. पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी जिशान अहमद आलम खान हा संशयास्पदरित्या आला.

सहकुटुंब आदिवासी पाड्यावर, एकल महिलांना रोहित पवारांकडून खास भाऊबीज

त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ फ्लॅस्टीक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे पारदर्शक स्फटिकासारखे पावडर स्वरुपात असलेले एमडी (मेफेड्रोन) हे अंमली पदार्थ आढळून आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने जिशान अहमद आलम खान याच्या जवळ सापडलेले अंमली पदार्थ जप्त केले. तसेच त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed