पुणे : शहर काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत गटबाजी काही नवीन नसल्याचं चित्र आहे. काँग्रेसचा विरोध हा विरोधकांवर कमी आणि अंतर्गत होताना जास्त पाहायला मिळतो. आज काँग्रेसच्या शहर कार्यकर्त्यांमध्ये ही असाच वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. हा वाद पूर्णपणे टोकाला गेला असून काँग्रेससाठी ११ वर्ष काम करणारे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. हा राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळं काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.
काय म्हटलं आहे राजीनाम्यात
काय म्हटलं आहे राजीनाम्यात
प्रति,
मा. नाना पटोले साहेब
प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.
महोदय,
मागील दोन वर्षांपासून मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्ता पदावर काम करत आहे. आपण ही संधी दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
मी माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे यापुढे या पदावर काम करण्यास असमर्थ आहे. या जबाबदारीतून मला मुक्त करावे ही नम्र विनंती. आजवरच्या काँग्रेस पक्षातील ११ वर्षांच्या काळात मला सहकार्य केलेल्या सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार.
माहितीस्तव
हनुमंत पवार
मात्र, पुणे शहर काँग्रेसमध्ये वाद अद्याप कोणत्या कारणावरून झाले हे समजू शकला नाही. मात्र, पुणे काँग्रेस पक्षाच्या सगळं आलबेल आहे असे या अंतर्गत वादातून सध्या तरी दिसत नाही.