• Sat. Aug 8th, 2026
    Jalna Accident : भरधाव क्रेटा 90 फूट खोल विहिरीत कोसळली, सासू कारमध्येच अडकल्या, सुनेला बाहेर काढताच करुण अंत; भीषण अपघात दोघांचा मृत्यू

    Jalna Accident News : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जालन्यामध्ये एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्या सासू-सुन होत्या.

    भोकरदन क्रेटा कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध ते वालसावंगी मुख्य मार्गावर भरधाव क्रेटा कार तब्बल 90 फूट खोल विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. काल शुक्रवारी, 7 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कारमध्ये 2 महिला आणि 2 पुरुष असे एकूण 4 जण प्रवास करत होते. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

    कारमध्ये महिलेचा करुण अंत

    अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. विहिरीत कोसळलेल्या कारमधून 2 पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, कारमध्ये असलेल्या एका महिलेला गंभीर दुखापत झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, कारमध्ये आणखी एक 75 वर्षीय वृद्ध महिला अडकून पडल्याचं समोर आलं. विहीर तब्बल 90 फूट खोल असल्यानं वृद्ध महिलेला आणि कारला बाहेर काढण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर होतं. रात्रीपासून प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं.

    Maharashtra TimesNagpur Crime : दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला, बाहेर जातो सांगून पुन्हा परतलाच नाही, 20 वर्षीय तरण्याबांड पोराला संपवलं; घटनेचं गूढ वाढलं
    15 तासांच्या प्रयत्नांनंतर कारबाहेर अंधार, विहिरीची खोली आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, प्रशासनानं अथक प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर तब्बल 15 तासांच्या प्रयत्नांनंतर कारला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं. कारसोबतच त्यामध्ये अडकलेल्या 75 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. या दुर्घटनेत सुलताना बेगम जीआउल्ला खान (वय 45) आणि अख्तरबी खान (वय 75) या 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मृत महिला धावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मयत दोन्ही महिल्या सासू-सुन असल्याची माहिती समोर आली आहे.

    अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून येताना काळाचा घाला

    मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब आपल्या नात्यातील एका नातेवाईकाच्या अवघडराव सावंगी येथील अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून त्यांच्या मूळ गावी धावडा येथे परतत होते. मात्र, घरी परतत असतानाच पारध-वालसावंगी मार्गावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या 90 फूट खोल विहिरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि प्रशासनानं तातडीनं बचावकार्य हाती घेतल्यानं दोन पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र, दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    Maharashtra TimesTukaram Mundhe : पुण्यात पहिलं रिजेक्शन, तुकाराम मुंढेंचा किस्सा, पाषाण रोडला पहिलं चायनीज खाललं, तिथे जाऊन यावं म्हणतो, FDA आयुक्तांनी सूचकपणे पुढचं टार्गेट सांगितलं
    या भीषण अपघातामुळे धावडा परिसरासह संपूर्ण भोकरदन तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्रीपासून सुरू असलेलं बचावकार्य तब्बल 15 तास चाललं. अखेर कार आणि वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं. दोन्ही मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद करून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या अगदी बाजूला असलेल्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा