• Mon. Nov 25th, 2024

    ५० रुपयांत गोल्डन थाळीचा मोह ३८ हजारांना पडला, पाच महिन्यांनी आरोपींना अहमदाबादमधून अटक

    ५० रुपयांत गोल्डन थाळीचा मोह ३८ हजारांना पडला, पाच महिन्यांनी आरोपींना अहमदाबादमधून अटक

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: सोशल मीडियावरील जाहिराती पाहून स्वादिष्ट जेवणाची थाळी ऑर्डर करणे एकाला चांगलेच महागात पडले. या जेवणाच्या थाळीपायी ३८ हजार रुपये गमवावे लागल्याची घटना जूनमध्ये घडली. इंटरनेटच्या मायाजालातून फसवणूक करून नामनिराळे होऊ या भरवशावर असलेल्या आरोपींचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी त्यांना अहमदाबाद येथून बेड्या ठोकल्या. इरफान मलिक (वय ३५) आणि फैजान मोदन (वय ३०) अशी या आरोपींची नावे आहेत.

    दक्षिण मुंबईतील एका व्यक्तीने जूनमध्ये सोशल मीडियावर होलसेल दरात जेवणाची गोल्डन थाळी मिळत असल्याची जाहिरात पाहिली. फोटोत दिसणारे पदार्थ पाहून ती मागविण्याचा मोह त्यांना झाला. तसेच केवळ ५० रुपयांना ही जेवणाची थाळी मिळत असल्याने ही संधी न सोडण्याचा विचार केला. त्यातून जाहिरातीतील लिंकवर क्लिक करून त्यात नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक यासह क्रेडिट कार्डची माहिती त्यांनी भरली. त्यानंतर थाळीच्या ५० रुपयांचे पैसे देण्यासाठी त्यांना एक ओटीपी क्रमांक मोबाइलवर प्राप्त झाला. हा क्रमांक देताच सायबर चोरांनी त्यांच्या खात्यातून ३८ हजार रुपये वळते केले. त्यातून ५० रुपयांच्या थाळीच्या मोहापायी आपली ३८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे या व्यक्तीच्या लक्षात आले.

    नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

    याप्रकरणी त्यांनी डॉ. दा. भ. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्यामध्ये आरोपी गुजरात येथील असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला. गुजरात येथील अहमदाबादमध्ये आरोपी असल्याचे समोर येताच पोलिसांनी सापळा लावून त्यांना अटक केली.

    तपासात इरफान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीची लिंक पाठविल्याचे निष्पन्न झाले. तर फैजान याच्या बँक खात्यात क्रेडिट कार्डमधून चोरलेले पैसे वळते केल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
    फटाक्यांमुळे हवा प्रदूषणात भर, दिवाळीला शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed