• Sat. Sep 21st, 2024

दादांच्या आमदारांचा एक गट आणि शिंदेंच्या काही आमदारांचा थेट भाजप प्रवेश होईल : रोहित पवार

दादांच्या आमदारांचा एक गट आणि शिंदेंच्या काही आमदारांचा थेट भाजप प्रवेश होईल : रोहित पवार

मुंबई : भाजपने जी आश्वासने दिलेली होती, ती त्यांनी पूर्ण केली नाहीत, त्यामुळे आमच्याकडून सत्तेत गेलेले आमदार नाराज आहेत. लोकसभेपर्यंत त्यांना वापरून घेतलं जाईल, नंतर त्यांना सोडून दिलं जाईल, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. भाजपला खोटी आश्वासने देण्याची सवय आहे, पण ज्यावेळी आश्वासने पूर्ण करण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र ते माघार घेतात, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस सरकारचा समन्वय चांगला राखत आहेत. मात्र शिंदे गटातील अनेक मंत्र्यांच्या कारभारामुळे भविष्यात अनेक राजकीय अडचणी उभ्या राहू शकत असल्याचे मतही अजित पवार गटातील नेते खासगीत व्यक्त करीत आहेत. अजित पवार गटातील अनेक आमदारांच्या निधीबाबतही आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळे अनेक आमदारांच्या तक्रारींचा सूर वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले, अजित पवार आणि अमित शाह यांच्यातील नवी दिल्लीतील भेट सदिच्छा असू शकते. पण त्या भेटीत भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याची तक्रारही असू शकते. कारण भाजपला अनेकानेक आश्वासने द्यायची सवय आहे. पण दिलेली आश्वासने भाजप पूर्ण करत नाही. आमच्याकडून सत्तेत गेलेले आमदार नाराज आहेत. लोकसभेपर्यंत त्यांना वापरून घेतलं जाईल, नंतर त्यांना सोडून दिलं जाईल, असा दावा त्यांनी केला.

शिंदे गटामुळे आमच्या अडचणी वाढताहेत, अजितदादा गटाची अमित शाहांकडे तक्रार? नेमकं काय घडलं?
सत्तेत जाताना ठरल्यानुसार भाजप वागत नाही किंबहुना मदत करत नाही, असा आमदारांचा सूर आहे. काही विषयांत भाजपकडून मदत होणार होती, ती देखील होत नाहीये. त्यामुळे एकंदरित सत्तेतल्या दादा गटातल्या आमदारांची नाराजी असल्याचं रोहित पवार म्हणाले.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय जनतेने योग्य ठरवला, ग्रामपंचायत निकालानंतर अजितदादा गट उत्साही
त्याचवेळी लोकसभा झाल्यानंतर आमच्यातून फुटून गेलेला गट आणि शिंदे गटातील काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही रोहित पवार यांनी बोलून दाखवली. पण त्याचवेळी लोकसभेपर्यंत नाराज आमदारांना वापरून घेण्याचा डाव भाजपच्या मनात असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed