• Sat. Sep 21st, 2024
चिमुकला दिवाळीसाठी पणती लावत होता; अचानक बिबट्याने झडप घातली, अन् होत्याचं नव्हतं झालं

नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आसलेल्या निळवंडी गावात लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आठ वर्षीय मुलगा घराच्या ओट्यावर दिवाळी निमित्त पणती लावत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले असून ऐन दिवाळीत दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सूना भांडण करायच्या, पोरंही त्यांच्या बाजूने, घर सोडून वृद्धाश्रमात आले, जुनी दिवाळी आठवून राधाबाई रडल्या
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास निळवंडी येथे एक आठ वर्षीय मुलगा गुरु खंडू गवारी हा दिवाळी निमित्ताने पणती लावण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला उचलून नेले. यावेळी परिसरात त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला असता घराच्या मागच्या बाजूला उसाचे क्षेत्र असून त्या उसामध्ये आढळून आला. यावेळी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेने ८ वर्षीय मुलाच्या परिवारावर ऐन सणासुदीच्या काळात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी, मुख्यमंत्र्यांची नाश्त्यासाठी मामलेदार मिसळीला पसंती, बीलही स्वत भरलं!

घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी अशोक काळे हे घटनास्थळी दाखल होऊन मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. मागच्या गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्रंबकेश्वर दिंडोरी निफाड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून अनुचित प्रकार देखील घडले आहेत. दिंडोरी तालुक्यातील निळवंडी, हातनोरे, वाघाड, जांबुटके, मडकीजांब परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आता स्थानिक नागरिकांकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed