म.टा.वृत्तसेवा, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे इनोव्हेशन सेंटर सुरू होणार असून, त्यात तरुणांना शिक्षण, रोजगार, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमधील अद्ययावत माहिती मिळणार आहे, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली. जयहिंद लोकचळवळ या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी अशी केंद्रे उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद साधताना आमदार तांबे म्हणाले की, तरुणांना त्यांच्या उपयोगाची माहिती एकाच ठिकाणी मिळेल, असे ठिकाणच नाही. शिवाय समविचारी तरुणांना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी जागाही नाही. याच विचारातून इनोव्हेशन सेंटरची संकल्पना पुढे आली. तरुणांना या एका केंद्रावर जगभरातील संधींची माहिती मिळावी, त्यांना कोणत्याही गोष्टीतील मार्गदर्शन लागल्यास ते उपलब्ध व्हावे आणि आपसात चर्चा होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे, हा या सेंटरमागचा उद्देश असल्याचे तांबे म्हणाले.

काय असेल इनोव्हेशन सेंटरमध्ये?
– शिक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी करिअर गायडन्स, देशविदेशातील विविध अभ्यासक्रम आणि विद्यापीठांची माहिती
– सरकारी शिष्यवृत्ती आणि मदतीबाबत माहिती, तसेच विविध कौशल्यविकास मार्गदर्शन अभ्यासक्रम
– उद्योजकतेत रस असणाऱ्या तरुणांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत, सरकारकडून किंवा खासगी माध्यमातून मिळणाऱ्या निधीबाबत मार्गदर्शन
– को-वर्किंग जागा तयार करण्याचा प्रयत्न
– स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तसेच नोकरीतील विविध संधींबाबत मार्गदर्शन
– राजकीय, आर्थिक साक्षरतेचे धडे