पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार मकरंद पाटील यांच्यासह महाबळेश्वर, पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी तसेच हॉटेल व्यायसायिक उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, महाबळेश्वरला जागतिक पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. येथील निसर्गाचे आपणच संवर्धन करायला पाहिजे. हे सौंदर्य जर आपण टिकवले नाही, तर कोण टिकवणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की, अनेकांना नोकऱ्या नाहीत. स्ट्रॉबेरीची शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचा हा समतोल ढासळू न देण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असंही त्यांनी सांगितली.
महाबळेश्वरच्या वेण्णा नदीपात्रात चुकीच्या पद्धतीने बांधकामे झाली आहेत. तालुक्यात बाहेरून आलेल्या लोकांनी जरी बांधकामे केली असली, तरी गेल्या काही वर्षांत स्थानिकांची कुटुंबेदेखील वाढून विस्तारली गेली आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर उत्तराखंडसारखे भीषण संकट आपल्यावर ओढावेल, असंही ते म्हणाले.
चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला होत असतो. त्यामुळं जर काही घटना घडली तर त्याला कोण जबाबदार असेल, असाही प्रश्न उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अधिकारी वर्गानं चांगल्या प्रकारे भूमिका मांडली आहे. जर आपण महाबळेश्वरचं सौंदर्य आपण जपलं नाही तर कोण जपणार नाही, असंही ते म्हणाले.
एक काळ असा होता की लोणावळ्याला सर्वत्र हिरवीगार वृक्षराजी पाहायला मिळत होती. आता येथील वृक्षांची अवस्था वाईट झाली आहे. तेथील झाडांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर व इथल्या निसर्गाची जर आपण जपणूक केली नाही, तर भविष्यात महाबळेश्वरचा लोणावळा व्हायला वेळ लागणार नाही, असंही उदयनराजे भोसले म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News