• Mon. Nov 25th, 2024

    खोके सरकारनं शाखा पाडून खोकं आणून ठेवलं, गद्दारांसाठी ठाणेकर पुरेसे, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

    खोके सरकारनं शाखा पाडून खोकं आणून ठेवलं, गद्दारांसाठी ठाणेकर पुरेसे, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

    ठाणे : महाराष्ट्रातील खरं चित्र माध्यमांच्याद्वारे समोर आलं आहे. पोलिसांना दोष देणार नाही, या सरकारनं वारकऱ्यांवर लाठी हल्ला करायला लावला. या सरकारनं शांततेनं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करायला लावला. आज त्याच पोलिसांना चोरांचं संरक्षण करायला लावलं आहे. २० ते २५ वर्षांपासून शिवसेनेची शाखा बुलडोझर लावून पाडली आणि खोके सरकार म्हटल्यावर खोकं आणून ठेवलं आहे. आम्ही ते हटवणार आहोत. हे कार्यालय महापालिकेनं पाडलंय का? आता ठेवलेलं डबडं अधिकृत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

    शिवसेना ही एकच आहे आणि आमची आहे. शिवसेनेची शाखा होती तिकडेच राहील. पोलिसांना प्रशासनाला सांगतो बाजूला व्हा, आम्ही बघून घेतो. पण, पोलीस त्यांचं संरक्षण करणार हे चालणार नाही. चोर म्हणून जो शिक्का लागला तो आयुष्यभर राहणार आहे. मी दोन चार दिवसांपूर्वी मी येथे येणार असल्याचं जाहीर केलं होतं. भाडोत्री गुंडांना पोलीस संरक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्राची दिवाळी वाईट होऊ नये म्हणून आम्ही संयम बाळगलेला आहे. दरवेळी आम्ही संयम बाळगाणार आणि ते यम असं चालणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
    पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
    गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी येण्याची गरज नाही ठाणेकर सज्ज आहेत. दिवाळी झाल्यानंतर महिनाभरात ठाण्यात सभा घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मविआची सभा होईल पण जिथं जिथं चोरांची गुंडागर्दी होईल तिथं मविआच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं उभं राहावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी गद्दारांच्या वाटा गद्दारांना माहिती, असं म्हटलं.
    पाकिस्तानला सेमी फायनलसाठी अखेरचे समीकरण, ३३८ धावा किती षटकांत कराव्या लागणार जाणून घ्या…

    पोलिसांचा अनादर व्हावा असं मी वागलेलो नाही आणि वागणार नाही. पोलिसांनी जरांगे पाटील शांततेत बसले होते तिथल्या माता भगिनींवर त्यांनी पाशवी हल्ला केला. पोलिसांची हतबलता महाराष्ट्र आणि देशानं पाहिली आहे. आज त्यांनी सत्तेच्या माजावर शाखा पाडली उद्या ते घरं पाडतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे त्याला त्यांनी जागावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
    जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात, बंदी असूनही कंटेनर लोणावळ्यात, उतारावरील वळणावर पलटी, तिघांचा मृत्यू
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed