दीपावलीच्या सुट्टीमुळे मुंबईतील चाकरमानी रेल्वेने कोल्हापूरच्या दिशेने जात असताना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान तारगाव येथे रेल्वे बंद पडली. रेल्वे इंजिन चालकाने बराच वेळ प्रयत्न करून ही रेल्वे इंजिन सुरू झालेच नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने किर्लोस्करवाडी येथून दुसरे इंजिन आणून नंतर रेल्वे पुढे मार्गस्थ होईल, असे सांगितले. त्यामुळे जवळपास दोन तासापेक्षा जास्त काळ प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर अडकून पडावे लागले, तर मसूर- कराड या जवळपास जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेतून उतरून खाजगी वाहनाने घरी जाण्याचे पसंत केले.
दरम्यान, किर्लोस्करवाडी येथून दुसरे इंजिन आणल्यानंतर रेल्वे ६ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली. या काळात कोणतीही रेल्वे एक्सप्रेस गाडी या मार्गावरून धावत नसल्याने कोणतीही अडचण आली नाही. कोयना एक्सप्रेस ही गाडी रेल्वे तारगाव रेल्वे स्टेशनवरच बंद पडल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या गाड्या रेल्वे स्टेशनवरच ट्रॅक बदलून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मुंबईहून सकाळी साडेआठ वाजता सुटलेली कोयना एक्सप्रेस ११०२९ ही गाडी कोरेगावमध्ये ४.१५ ला आली. त्यानंतर ती पुढे तारगाव रेल्वे स्टेशनला सायंकाळी ४.४५ वाजता पोचले असता रेल्वेचे इंजीन नादुरुस्त होऊन बंद पडली. ती साधारण एक तास त्या ठिकाणीच उभी होती.त्यामुळे रेल्वेतून प्रवासी करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. दिवाळीच्या सणात अचानक निर्माण झालेल्या या अडचणीमुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला.
Read Latest Maharashtra News And Marathi News