• Mon. Jun 15th, 2026

    मुंबईकरांसाठी दिवाळीनिमित्त गुड न्यूज, मध्य रेल्वेकडून तिन्ही मार्गांवरील मेगा ब्लॉक रद्द

    मुंबईकरांसाठी दिवाळीनिमित्त गुड न्यूज, मध्य रेल्वेकडून तिन्ही मार्गांवरील मेगा ब्लॉक रद्द

    मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान रविवारी दिवसा घोषित केलेला ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान चर्चगेट ते विरार/डहाणू रोडदरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही, असे पश्चिम रेल्वेने यापूर्वीच जाहीर केले आहे. यामुळे सणासुदीच्या सुट्टीत आप्तस्वकीयांच्या भेटीगाठीसाठी मुंबई लोकल प्रवाशांच्या दिमतीला सज्ज राहणार आहे.

    ‘लक्ष्मीपूजनालाच ब्लॉकचा मुहूर्त’ या मथळ्याखाली महाराष्ट्र टाइम्सने ठळकपणे बातमी प्रसिद्ध केली होती. मटाच्या बातमीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून रविवारी पूर्व नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्लॉक रद्द करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. मात्र मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. यांमुळे नातेवाईकांसह आप्तस्वकीयांच्या भेटीगाठीसाठी लोकलने जाण्याचे नियोजन अनेक प्रवाशांचे आहे. मात्र ऐन दिवाळीत मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉकची घोषणा केल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागावर प्रवासी , प्रवासी संघटनांसह सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती.

    खोके सरकारनं शाखा पाडून खोकं आणून ठेवलंय, गद्दारांसाठी ठाणेकर पुरेसे, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
    बातमी अपडेट होत आहे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed