• Sat. Sep 21st, 2024
Dhangar Reservation: धनगर शक्तिप्रदत्त समितीत फडणवीसांना घ्या; गोपीचंद पडळकरांची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नासाठी धनगर शक्तिप्रदत्त समिती जाहीर केली आहे. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी त्यांनी एक पत्र एकनाथ शिंदे यांना नुकतेच दिले. या पत्रात गोपिचंद पडळकर यांनी धनगर शक्तिप्रदत्त समिती प्रभावीपणे काम करेल, अशी आशा व्यक्त करतानाच धनगरांच्या आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत प्रभावीपणे काम केले आहे. त्यामुळे त्यांची या समितीत नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. तर जे आदिवासांनी ते धनगरांना ही मुळात संकल्पनाच देवेंद्र फडणवीस यांची होती, याकडे पडळकर यांनी लक्ष वेधले.

धनगर समाजासाठी आनंदाची बातमी! अनुसूचित जमाती प्रवर्गातील १३ योजनांचा लाभ मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

आरक्षण प्रश्नी मंत्र्यांमध्ये वाद नाही

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये तीव्र मतभेद झाल्याचे अतिरंजित चित्र शिवसेनेच्या उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला असला, तरी असा कोणताही वाद झाला नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिले. सर्वच मंत्र्यांनी संवेदनशील प्रश्नावर संयमाने बोलावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत केली. मंत्री परस्परांच्या अंगावर धावून जाणे असा प्रकार झाला नाही. संजय राऊत हा आरोप सिद्ध करू शकले, तर आम्ही मंत्रिपदाचा राजीमाना देऊ, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar: घोंगडी, काठी सोडा आता हातात कुऱ्हाड घ्या; धनगर आरक्षणावरुन गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

‘ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, अशी सर्वांची मागणी आहे. त्यामुळेच आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दिले आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण द्यावे, असे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे कोणताही वाद नाही. कुणीही गैरसमज करून घेऊ नये,’ असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

सरकारला हाबाडा दाखवू, नेत्यांना घराबाहेर पडून देणार नाही ; धनगर आरक्षणासाठी बीडमध्ये मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed