• Sat. Sep 21st, 2024

दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांची विक्री, FDAची मोठी कारवाई, ३९७ किलो बनावट पनीर साठा नष्ट

दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांची विक्री, FDAची मोठी कारवाई, ३९७ किलो बनावट पनीर साठा नष्ट

नाशिक: अन्न औषध प्रसासनाने शहराच्या सिडको व अंबड भागातून ८४ हजार ११० रुपये किमतीचा ३९७ किलो बनावट पनीर साठा दोन ठिकाणाहून जप्त केला असून तो तातडीने नष्ट करण्यात आला आहे.

अन्न औषध प्रशासनाला गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पथकाने ही कारवाई करताना अत्यंत खबरदारी घेतली होती. गुरुवार ( ८ नोव्हे) रोजी ६.३० वाजेपासून सिडको येथे सापळा रचण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे मे. विराज एंटरप्रायजेस, दुर्गा मंदिरच्या मागे, त्रिमुर्ती चौक, सिडको, नाशिक या ठिकाणी तपासणी केली असता पनीरमध्ये खाद्य तेलाची भेसळ असल्याचा संशय आला त्यावरुन १६ हजार २८० रुपये किमतीचा सुमारे ७४ किलो साठा जप्त करण्यात आला. हा साठा नष्ट करण्यात आला आहे.

कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा भाजपच्या वाटेवर, शाहांच्या उपस्थितीत सुरेश कुटे हाती ‘कमळ’ धरणार, टायमिंगची चर्चा
दुसरी कारवाई गुरुवार (९ नोव्हे)रोजी करण्यात आली. ही कारवाई सकाळी ७.३० वाजता करण्यात आली. अंबड येथील साई एंटरप्रायजेस, साईग्राम कॉलनी, उपेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ, या दुकानाची तपासणी केली असता या ठिकाणी पनीरमध्ये खाद्यतेलाची भेसळ असल्याचा संशय आला. त्यावरुन ६७ हजार ८३० रुपये किमतीचा ३२३ किलो किलो साठा जप्त करण्यात आला. हा सर्व साठा नष्ट करण्यात आला आहे.

दोन्ही पनीर हे अन्ननमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे, ही कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप व विनोद धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, , अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे, वाहनचालक निवृत्ती साबळे यांच्या पथकाने केली आहे. सह आयुक्त (नाशिक विभाग) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नागरीकांनी दुधापासून तयार झालेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच खरेदी करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

साफसफाई करताना तिसऱ्या मजल्यावरुन पाय घसरला, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आक्रित घडलं
या दोन्ही कारवाया करताना अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून या दुकानाच्या मागावर आमचे पथक होते. उत्पादन सुरु असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
मनीष सानप, सह आयुक्त

दिवाळी खरेदीसाठी दुकानात नेलं, चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेना

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed