• Mon. Nov 25th, 2024
    धीरेंद्र शास्त्रींनी ताफा थांबवला, शेतकरी कुटुंबियांसोबत चहाचा आस्वाद; Video व्हायरल

    छत्रपती संभाजीनगर : वक्तव्यांसोबतच उच्च राहणीमानामुळे नेहमी चर्चेत असणारे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन शहराकडे कर्जत असताना फुलंब्री तालुक्यात शेतकरी फुलारे घराजवळ आपल्या वाहनाचा ताफा थांबवला. यावेळी धिरेंद्र शास्त्री यांनी शेतकऱ्यांच्या घरी चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी कुठलच आसन न घेता त्यांनी थेट जमिनीवर बसून शेतकऱ्यांच्या घरचा चहाचा आस्वाद घेतला. शेतकरी कुटुंबियांनी चहा आणल्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या पात्रामध्ये तो चहा घेतला. यावेळी शेतकरी असलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेशी त्यांनी गप्पा मारत महिलेच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतला. धीरेंद्र शास्त्रींचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम यांच्या राम कथा व दरबाराचं आयोजन करण्यात केल होतं. रेल्वे स्टेशन जवळील रामलीला मैदानावर या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या धीरेंद्र शास्त्री यांनी वेरूळ येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी खुलताबाद गाठलं. दर्शन करून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये परतत असताना फुलंब्री येथे त्यांचा ताफा आला. यावेळी त्यांनी शेतकरी असलेल्या फुलारे कुटुंबीयांच्या घरासमोर ताफा थांबवत चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली.

    राम-सीता हा फक्त हिंदूंचा वारसा नव्हे, राज ठाकरेंच्या दीपोत्सवात जावेद अख्तर यांचं वक्तव्य
    धीरेंद्र शास्त्री शेतकऱ्यांच्या घरी चहा घेणार असल्यामुळे सोबत असलेल्यांना आश्चर्य वाटलं. त्यासोबतच शास्त्रींची सोय कशी करावी? हा प्रश्न अनेकांना पडला. मात्र, धीरेंद्र शास्त्री यांनी कुठलाही तामझाम न करता थेट फुलारे कुटुंबियांच्या अंगणात बसले. चहा होईपर्यंत त्यांनी फुलारे कुटुंबीयांशी संवाद साधला. चहा आल्यानंतर पात्रात चहा ओतून घेत त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. यावेळी जेष्ठ नागरिक महिलेची त्यांनी चांगल्या गप्पा देखील मारल्या. यावेळी काही महिला त्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी देखील करत होत्या.

    पुणेकर की मुंबईकर… हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार कोण?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *